शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

तीन रेल्वेगाड्या रद्द, २४ गाड्यांना विलंब

By admin | Updated: January 8, 2017 02:06 IST

दक्षिण मध्य रेल्वेंतर्गत काजीपेठ आणि बल्लारशा दरम्यान मालगाडीच्या वॅगन रुळावरून घसरल्यामुळे

रेल्वे वेळापत्रक विस्कळीतच : रेल्वेस्थानकावर वाढली प्रवाशांची गर्दी नागपूर : दक्षिण मध्य रेल्वेंतर्गत काजीपेठ आणि बल्लारशा दरम्यान मालगाडीच्या वॅगन रुळावरून घसरल्यामुळे रेल्वेगाडी क्रमांक १२६१५ चेन्नई-दिल्ली जीटी एक्स्प्रेस, १२६२१ चेन्नई-दिल्ली तामिळनाडू एक्स्प्रेस आणि १२७७२ नागपूर-सिकंदराबाद या तीन रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या तर २४ रेल्वेगाड्या दुसऱ्या मार्गाने वळविल्यामुळे त्या विलंबाने धावत आहेत. मालगाडी रुळावरून घसरल्यामुळे दक्षिण आणि उत्तरेकडील भागातून येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आल्यामुळे या गाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा विलंबाने धावत आहेत. दरम्यान विलंबाने येणाऱ्या रेल्वेगाड्यात १२७०६ सिकंदराबाद-गुंटुर एक्स्प्रेस १६ तास, १२७२७ विशाखापट्टणम-हैदराबाद गोदावरी एक्स्प्रेस ३० तास, १८०३० शालिमार-एलटीटी एक्स्प्रेस ४.१५ तास, १२८७९ लोकमान्य टिळक टर्मिनस-भुवनेश्वर एक्स्प्रेस ८ तास, १२४०९ रायगड-हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस १५ तास, १२७२३ हैदराबाद-नवी दिल्ली तेलंगाणा एक्स्प्रेस २.१५ तास, १२५७० आनंद विहार-जयनगर गरीबरथ एक्स्प्रेस १.३० तास, १२५२२ एर्नाकुलम-बरौनी राप्तीसागर एक्स्प्रेस १.१५ तास, १२२९६ पाटलीपुत्र-बंगळुर संघमित्रा एक्स्प्रेस ७.३० तास, २२३५१ पाटलीपुत्र-यशवंतपूर एक्स्प्रेस ३.३० तास, १२७९१ सिकंदराबाद-दानापूर एक्स्प्रेस २ तास या गाड्यांसह २४ रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत आहेत. रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. आधीच दिल्लीकडून येणाऱ्या रेल्वेगाड्या दाट धुके पडल्यामुळे उशिराने धावत आहेत. यात मालगाडी रुळावरून घसरल्यामुळे दक्षिणेकडून येणाऱ्या रेल्वेगाड्यांच्याही मार्गात बदल केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय आणखीनच वाढली आहे. सलग २४ तासापासून रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होऊन रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. शनिवारीही दिवसभर प्रवासी उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्याची चौकशी करताना दिसले. (प्रतिनिधी)