शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात धावतात तीन हजारावर ई-रिक्षा; नोंदणी मात्र ५०० चीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 10:31 IST

नागपुरात सुमारे तीन हजारावर ई-रिक्षा धावत असताना केवळ ५०० वर ई-रिक्षांची नोंदणी झाली आहे.

ठळक मुद्देअवैध ई-रिक्षांवर कधी होणार कारवाई?

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बॅटरीवर चालणाऱ्या ई-रिक्षाला मान्यता मिळून दोन वर्षांचा कालावधी लोटला आहे. नागपुरात सुमारे तीन हजारावर ई-रिक्षा धावत असताना केवळ ५०० वर ई-रिक्षांची नोंदणी झाली आहे. विशेष म्हणजे, ई-रिक्षा (प्रवासी वाहन) व ई-कार्ट (मालवाहू वाहन) यांना मोटर वाहन कायदा व नियम लागू करून त्यांची एक महिन्यात नोंदणी करण्यात यावी, असा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २४ जानेवारी रोजी राज्य शासनाला दिला. परंतु आठवडा होऊनही नोंदणीचा आकडा वाढला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.शहरातील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी, पेट्रोल-डिझेलचा वापर टाळण्यासाठी आणि शहरवासीयांना स्वस्तात वाहतूक सुविधा मिळवून देण्यासाठी विजेवर चालणाऱ्या ई-रिक्षाला २०१६ मध्ये हिरवी झेंडी मिळाली. त्यापूर्वीही हजारावर ई-रिक्षा उपराजधानीत धावत होत्या. मंजुरी मिळाल्यानंतर यात दुपटीने वाढ झाली. सद्यस्थितीत आठवडाभरात दोन नव्या ई-रिक्षा रस्त्यावर येत आहे. दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. असे असताना ई-रिक्षाच्या नोंदणीविषयी उदासीनता दिसून येत आहे.

नोंदणीसाठी १९ अटी व शर्तीमोटार वाहन कायद्यामधील तरतुदीनुसार ई-रिक्षासंदर्भातील परवाने देण्याचे निर्देश आहेत. परंतु परवाने मिळविण्यासाठी अर्जदाराकडे ई-रिक्षा चालविण्याचा वैध परवाना व सार्वजनिक सेवा वाहन चालविण्याचे बॅज आणि लॅमिनेटेड स्वरूपात ओळखपत्र असण्याची पहिली अट आहे. याशिवाय पोलीस विभागात दखलपात्र गुन्ह्याची नोंद नसावी, शासन किंवा निमशासकीय सेवेत तो नसावा, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारच्या वाहनाचा परवाना नसावा, यासह प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या मार्गावरच ई-रिक्षा चालविण्यासह १९ अटी व शर्ती ठेवण्यात आल्या. या सर्वांचे पालन करीत ई-रिक्षाची नोंदणी करणे रिक्षाचालकांसाठी सोपे काम नाही. यामुळे नोंदणी होत नसल्याचे एका ई-रिक्षा चालकाने सांगितले.

अडीच हजारावर ई-रिक्षा अवैधप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरमध्ये आतापर्यंत साधारण ५० तर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूर येथे ४५० ई-रिक्षांची नोंदणी झाली आहे. यावरून सध्याच्या घडीला अडीच हजारावर ई-रिक्षा अवैधपणे रस्त्यावर धावत आहेत.

नोंदणी करा अन्यथा कारवाईई-रिक्षा नोंदणी करण्याचे आवाहन कार्यालयाने यापूर्वीही वारंवार केले आहे. परंतु नोंदणीला कमी प्रतिसाद पाहून मंगळवारपासून विशेष पथकाच्या मदतीने ई-रिक्षा तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. नोंदणी नसलेल्या ई-रिक्षांवर कारवाई करण्यात येईल.-शरद जिचकार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस