शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील तीन परिसर सील; दोन परिसर मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 22:45 IST

अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ होत आहे. बुधवारी शहरात आणखी तीन परिसर सील करण्यात आले, तर दोन परिसर हे कोरोनामुक्त झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ होत आहे. बुधवारी शहरात आणखी तीन परिसर सील करण्यात आले, तर दोन परिसर हे कोरोनामुक्त झाले.गांधी झोन महाल क्रमांक ६ अंतर्गत प्रभाग क्रमांक ८ व ९ येथील भानखेडा व टिमकी (पावटी मंदिर) हे परिसर प्रतिबंधित क्षेत्रातून वगळण्यात आले आहे. नव्या प्रतिबंधित क्षेत्रात धंतोली झोन क्रमांक ४ अंतर्गत प्रभाग क्रमांक ३५ येथील रेणुकानगरी, गांधी झोन महाल क्रमांक ६ अंतर्गत प्रभाग क्रमांक १९ येथील परदेशी तेलीपुरा व याच झोनअंतर्गत प्रभाग ८ येथील डोबीनगर या परिसरात कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर हे परिसर प्रतिबंधित करण्यात आले आहे. उपरोक्त परिसरामध्ये कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर शहरातील इतरत्र हा संसर्ग पसरू नये, याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून परिसर सील करण्यात आले आहेत. प्रतिबंधित या क्षेत्रात अत्यावश्यक सेवा, अ‍ँम्ब्युलन्स आदींना आदेशातून वगळण्यात आले आहे.नव्याने प्रतिबंधित क्षेत्रनव्या प्रतिबंधित क्षेत्रात अनुक्रमे रेणुकानगरी येथील उत्तर-पूर्वेस वांदिले यांचे घर, उत्तर-पश्चिमेस अनिल बंबावाले यांचे घर, दक्षिण-पश्चिमेस प्रभाकर गायकवाड यांचे घर, दक्षिण-पूर्वेस यासटवार यांचे घर. परदेशी तेलीपुरा येथील दक्षिण-पूर्वेस एन.एस.फास्ट फूड, उत्तर-पूर्वेस वर्मा बिल्डिंग, उत्तर-पश्चिमेस अनुष्का ब्युटी पार्लर आणि दक्षिण-पश्चिमेस उमरेठे यांचे घर. याच झोनअंतर्गत प्रभाग ८ येथील डोबीनगर येथील उत्तर-पश्चिमेस निसार भाई यांचे घर, उत्तर-पूर्वेस बब्बू पानठेला व उत्तरेस डेड गल्लीचा समावेश आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर