शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील तीन पोलीस कल्याण पेट्रोल पंप अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 21:02 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी शहरातील सीआयडी कार्यालय, गिट्टीखदान व सेमिनरी हिल्स परिसरातील पोलीस कल्याण पेट्रोल पंप अवैध ठरवले. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांनी हा निर्णय दिला. तिन्ही पेट्रोल पंप अनिवार्य नियमांची पूर्तता करीत नाही असे निरीक्षण न्यायालयाने निर्णयात नोंदवले आहे. या निर्णयामुळे पोलीस वेलफेअर सोसायटी व इंडियन आॅईल कॉर्पोरेशन यांना जोरदार दणका बसला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : पोलीस वेलफेअर सोसायटीला दणका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी शहरातील सीआयडी कार्यालय, गिट्टीखदान व सेमिनरी हिल्स परिसरातील पोलीस कल्याण पेट्रोल पंप अवैध ठरवले. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांनी हा निर्णय दिला. तिन्ही पेट्रोल पंप अनिवार्य नियमांची पूर्तता करीत नाही असे निरीक्षण न्यायालयाने निर्णयात नोंदवले आहे. या निर्णयामुळे पोलीस वेलफेअर सोसायटी व इंडियन आॅईल कॉर्पोरेशन यांना जोरदार दणका बसला आहे.यासंदर्भात अ‍ॅड. प्रभाकर सोनटक्के यांनी जनहित याचिका दाखल केली होती. नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्रथमदृष्ट्या आढळून आल्यानंतर न्यायालयाने गेल्या ६ जून रोजी तिन्ही पेट्रोल पंप सुरू करण्यास अंतरिम मनाई केली होती. अंतिम सुनावणीनंतर हे पेट्रोल पंप अवैध घोषित करण्यात आले. पोलीस वेलफेअर सोसायटी व इंडियन आॅईल कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस कल्याण पेट्रोल पंप योजना राबविली जात आहे. पोलीस व त्यांच्या कुटुंबांकरिता कल्याणकारी कार्य करणे सोसायटीकडून अपेक्षित आहे. त्यासाठी शासनाने सोसायटीला विविध ठिकाणी भूखंड दिले आहेत. त्या भूखंडांचा रुग्णालये, शाळा, समाज भवन इत्यादीसाठी उपयोग करायला पाहिजे. परंतु, सोसायटीने या भूखंडांवर पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी इंडियन आॅईल कॉर्पोरेशनसोबत करार केला आहे. त्या करारामुळे सोसायटीच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेला आहे. सीआयडी कार्यालय, गिट्टीखदान व सेमिनरी हिल्स परिसरातील पोलीस भूखंडांवर नियमानुसार पेट्रोल पंप लावले जाऊ शकत नाहीत. तसे केल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. ओ. डी. जैन व अ‍ॅड. राशी देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसPetrol Pumpपेट्रोल पंप