शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नागपुरात तीन पिस्तूल आणि पाच काडतूस जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 23:07 IST

तीन पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसांसह तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. मोहम्मद शफिक अन्सारी (वय ३४, रा. शिवशक्तीनगर), आसिफ अहमद शमसुद्दीन अहमद (वय ३८, रा. योगी अरविंदनगर) आणि राजा उर्फ मोहम्मद शाहरुख खान मोहम्मद इकबाल (वय २४, हसनबाग) अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी गुरुवारी पत्रकारांना ही माहिती दिली.

ठळक मुद्देतीन गुन्हेगार गजाआड : गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसांसह तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. मोहम्मद शफिक अन्सारी (वय ३४, रा. शिवशक्तीनगर), आसिफ अहमद शमसुद्दीन अहमद (वय ३८, रा. योगी अरविंदनगर) आणि राजा उर्फ मोहम्मद शाहरुख खान मोहम्मद इकबाल (वय २४, हसनबाग) अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी गुरुवारी पत्रकारांना ही माहिती दिली.गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पथक मंगळवारी रात्री यशोधरानगरातील मोहम्मद रफी चौक परिसरात गस्त करीत होते. त्यांना नासुप्रच्या मैदानाजवळ मोहम्मद शफिक आणि आसिफ अहमद संशयास्पद अवस्थेत दिसले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन देशी बनावटीची पिस्तुलं आणि तीन जिवंत काडतूस आढळली. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर करून पीसीआर मिळवला असता आरोपींनी हे पिस्तूल आणि काडतुसं हसनबागमध्ये राहणारा राजा ऊर्फ शाहरूख खानकडून घेतल्याचे सांगितले. त्यामुळे गुरुवारी राजालाही पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून पोलिसांना पुन्हा एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसं मिळाली. आपण हे पिस्तूल आणि काडतूस बाहेरच्या राज्यातून विकत आणल्याचे राजाने पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलीस पथक पिस्तूल तसेच काडतुसाच्या तस्करीत गुंतलेल्यांचा छडा लावण्यासाठी बाहेरच्या राज्यात जाणार आहे.आरोपी कुख्यात गुन्हेगारआरोपी राजा ऊर्फ शाहरूख हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याने गेल्या वर्षी तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत फायरिंग करून खळबळ उडवून दिली होती. आररोपी शफिक याच्यावरही गुन्हे दाखल आहेत तर आसिफ हॉटेल चालवतो. आसिफ आणि शफीक हे दोघे जनावरांच्या खरेदी विक्रीतही सहभागी आहेत. त्यांना अटक करण्याची कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक प्रभाकर शिवूरकर, ज्ञानेश्वर भेदोडकर, हवलदार राजेश क्षीरसागर, दया बिसांद्रे, शैलेश पाटील, रफिक खान, अरुण धर्मे, राजेश ठाकूर यांनी बजावली.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसArrestअटक