शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
3
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
4
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
5
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
6
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
7
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
8
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
9
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
10
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
11
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
12
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
13
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
14
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
15
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
16
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
17
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
18
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
19
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
20
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना

दहावीचे तीन टक्के गुण बुडणार; सरकार व शिक्षण मंडळाचा अजब निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 10:16 IST

राज्य सरकार व महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी शास्त्रीय कलेत पारंगत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांबाबत अन्यायकारक धोरण अवलंबले आहे.

ठळक मुद्देशास्त्रीय कलेला फटका

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकार व महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी शास्त्रीय कलेत पारंगत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांबाबत अन्यायकारक धोरण अवलंबले आहे. इयत्ता सातवीपूर्वी शास्त्रीय कलेची तिसरी (प्रवेशिका पूर्ण) व पाचवी (मध्यमा पूर्ण) या दोन्ही किंवा या दोनपैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीमध्ये तीन टक्के अतिरिक्त गुण मिळणार नाही, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे तीन टक्के गुण बुडणार आहेत.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, २४ नोव्हेंबर २०१७ रोजी जारी या शासन निर्णयाचे मंडळाद्वारे पालन केले जात असून त्यानुसार इयत्ता सातवीपूर्वी शास्त्रीय कला परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दहावीच्या हजारो विद्यार्थ्यांचे अतिरिक्त गुणांचे प्रस्ताव फेटाळण्यात आले आहेत. मंडळाचे अधिकारी स्वत:ला या वादापासून दूर ठेवून सर्व जबाबदारी सरकारवर ढकलत आहेत.परंतु, अधिक चौकशी केल्यानंतर राज्य सरकार व मंडळ यांनी मिळून हा निर्णय घेतल्याचे कळले. सरकारने हा निर्णय घेण्यापूर्वी मंडळाच्या तज्ज्ञांचा सल्ला मागितला होता. त्यानंतर तज्ज्ञांनी सरकारची री ओढत सकारात्मक अहवाल दिला. असे असले तरी, मंडळाचे अधिकारी सुरुवातीला सरकारने हा निर्णय एकतर्फी घेतल्याचे सांगत होते. परंतु, त्यानंतर त्यांनी मंडळाच्या तज्ज्ञांनी सरकारला सल्ला दिला होता हे मान्य केले. असा अन्यायकारक निर्णय घेण्याचे कारण विचारले असता कुणीच तोंड उघडले नाही. इयत्ता सातवीपूर्वीचे विद्यार्थी समजदार नसतात. परीक्षा देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जातो. त्यामुळे ते परीक्षेला बसतात. त्यांच्यासोबत अशी बळजबरी होऊ नये याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती मंडळाचे अधिकाऱ्यांनी दिली. परंतु, संबंधित विषयाचे शिक्षकांना मंडळाचा हा युक्तिवाद मान्य नाही. संबंधित कलेत परिपक्व होतपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षेत बसवले जात नाही असे त्यांनी सांगितले व सरकारच्या निर्णयाचा विरोध केला. आरक्षित जागांवर प्रवेश नाही२०१० मधील शासन निर्णयानुसार, शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला व क्रीडा प्रमाणपत्रधारक विद्यार्थ्यांसाठी इयत्ता अकरावीमध्ये २ ते ३ टक्के जागा आरक्षित ठेवल्या जातात. शास्त्रीय कलेच्या अतिरिक्त गुणासाठी अपात्र ठरणाºया विद्यार्थ्यांना या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. गेल्यावर्षी अशा हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला होता अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल