शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांना लुटणाऱ्या तिघांना कारावास

By admin | Updated: March 30, 2017 02:47 IST

गोंदिया-दुर्ग रेल्वेस्थानक दरम्यान अजमेर पुरी एक्स्प्रेसमधील प्रवाशांवर हल्ला करून लुटणाऱ्या तीन लुटारूंना रेल्वे न्यायालयाचे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी

 पुरी एक्स्प्रेस : गोंदिया-दुर्ग दरम्यान घडला होता थरार नागपूर : गोंदिया-दुर्ग रेल्वेस्थानक दरम्यान अजमेर पुरी एक्स्प्रेसमधील प्रवाशांवर हल्ला करून लुटणाऱ्या तीन लुटारूंना रेल्वे न्यायालयाचे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. एन. फड यांच्या न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडित प्रवाशांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला. सौरभ चंद्रकांत बुरांडे (२४) रा. नवापारा, अनिल ऊर्फ गोलू जीवन सिन्हा (२२)रा. रायपूर डगनिया आणि शत्रुघ्न ऊर्फ महेश नरोत्तम तांडी (२८) रा. मोवा रायपूर, अशी आरोपींची नावे आहेत. खटल्याची पार्श्वभूमी अशी, ओडिशा राज्याच्या मयूरभंज येथील रहिवासी बुधियासिंग, प्रदीपसिंग, रंजितसिंग, पप्पूसिंग, लेडूसिंग आणि शैलूसिंग हे रोजगारासाठी अहमदाबाद येथे गेले होते. काम पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या ठेकेदाराने त्यांना ५० हजार रुपये दिले होते. ही रक्कम घेऊन ते ३० जुलै २०१६ रोजी अहमदाबादहून आपल्या गावाकडे जाण्यासाठी अजमेर पुरी एक्स्प्रेसने निघाले होते. बोगी रिकामी असल्याने हे सर्व मजूर मिळेल त्या बर्थवर झोपलेले होते. मात्र रंजितसिंग हा जागा होता आणि बॅगांवर लक्ष ठेवून होता. ३१ जुलै रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास ही एक्स्प्रेस गोंदिया रेल्वेस्थानकावर थांबली होती. त्याच वेळी चार अनोळखी इसम बोगीत शिरले होते. ही एक्स्प्रेस गोंदियाहून पुढील प्रवासासाठी निघाली असता लुटारूंनी सर्वांना मारहाण करायला सुरुवात केली होती. लुटारूंनी त्यांच्यावर ब्लेडने हल्ला करून जखमी केले होते. त्यांच्याजवळील तीन बॅग, दोन मोबाईल, असा एकूण ५१ हजारांचा ऐवज लुटला होता. बोगीतील धोक्याची साखळी ओढून सर्व लुटारू अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले होते. या घटनेची तक्रार पीडित प्रवाशांनी दुर्ग रेल्वेस्थानक पोलिसांकडे केली होती. याच ठिकाणी जखमी प्रवाशांवर तेथील इस्पितळात उपचार करण्यात आले होते. हा गुन्हा गोंदियाच्या हद्दीत घडल्याने तो गोंदिया रेल्वे पोलिसांकडे सोपवण्यात आला होता. पोलिसांनी अज्ञात लुटारूंविरुद्ध भादंविच्या ३९४, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. गोंदिया रेल्वेस्थानक पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजयसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र गाडगे यांनी तपास करून या तीन लुटारूंना अटक केली होती. एक लुटारू अद्यापही गवसला नाही. तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र गाडगे यांनी न्यायालयात आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तिन्ही आरोपींना शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकारच्या वतीने सरकारी वकील क्रांती नेवारे यांनी तर आरोपींच्या वतीने अ‍ॅड. अश्विन वासनिक यांनी काम पाहिले. कॉन्स्टेबल प्रमोद जाधव, अनिल गायकवाड, हेड कॉन्स्टेबल अजय चरडे, गजेंद्र वाटमोडे, सुभाष मडावी, राहुल रेवतकर यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.(प्रतिनिधी)