शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अंबाझरी धरणावर नव्याने तीन एस्केप गेट उभारणार

By आनंद डेकाटे | Updated: March 7, 2024 17:50 IST

अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली.

नागपूर : अंबाझरी धरणावर पाण्याचा विसर्ग नियंत्रित करण्याच्यादृष्टीने नव्याने तीन एस्केप गेट उभारण्याचा निर्णय गुरूवारी घेण्यात आला असून या कामास लवकरच सुरुवात होणार आहे. धरणाच्या सांडव्याचा विसर्ग वाहून जाण्यासाठी नवीन पूल बांधकामाकरिता येत्या १० मार्च रोजी कार्यादेश काढण्यात येणार आहे. तसेच मनपातर्फे नव्याने चिन्हित ५६ अतिक्रमणांपैकी २१ काढण्यात आली आहेत. अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणाच्या या कामांसह अन्य कामांना गती देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी गुरूवारी प्रशासनाला दिल्या.

अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

बैठकीस समितीचे सदस्य सचिव तथा मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, सदस्य जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता पी.के.पवार, मनपाच्या अधिक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी आदी उपस्थित होते. नागपूर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डिकर ऑनलाईन पद्धतीने या बैठकीस उपस्थित होते.

अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी उच्च स्तरीय समितीच्या निर्देशाद्वारे विविध यंत्रणांनी सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजनांना सुरुवात केली आहे. यानुसार दुसऱ्या टप्प्या अंतर्गत विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. अवकाळी पावसामुळे अंबाझरी धरणातील पाण्याचा नाग नदी व नाल्यांमध्ये होणारा मोठा विसर्ग थांबविण्यासाठी या धारणावर तीन एस्केप गेट बसविण्यावर या बैठकीत शिक्का मोर्तब झाले. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था नाशिक आणि जलसंपदा विभागाने अभ्यासाअंती ४ बाय २.५ मिटर उंचीचे तीन गेट बसविण्याचे सुचविले. या कामाला गतीने पूर्ण करण्याच्या सूचना बिदरी यांनी दिल्या.अंबाझरी धरणाच्या सांडव्यावरून वाहणारा विसर्ग व्यवस्थितरित्या वाहून जाण्यासाठी रस्त्यावरील सद्याचा पूल तोडून नवीन पूल बांधण्याच्या प्रस्तावित कामांच्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग येत्या १० मार्च रोजी कार्यादेश काढणार आहे.

धरणातून दिवसाला २ लाख लिटर पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. येत्या १ एप्रिल रोजी जलसंपदा आणि मनपाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाणी उपसा वाढविणे किंवा कमी करण्या संदर्भात पाहणी करावी, असे निर्देश बिदरी यांनी दिले.

नासुप्रचा स्केटिंग रिंग पार्किंग स्लॅब काढून टाकण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. क्रेझीकॅसल येथून वाहणाऱ्या नाग नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी जलसंपदा विभाग सर्वेक्षण करीत आहेत. या सर्वेक्षणात मेट्रो आणि नासुप्रच्या अभियंत्यांनी सहभागी होऊन येत्या १५ मार्च पर्यंत सर्वे पूर्ण करण्याच्या सूचना बिदरी यांनी दिल्या.

६६ वृक्षांचे संवर्धन २९ वृक्ष वारसा श्रेणीतीलधरणाच्या दुरुस्ती, डागडुजी व पुनर्बांधणीची कामे सुरु आहेत. यासाठी तज्ज्ञ समितीकडून चिन्हीत करण्यात आलेली या परिसरातील छोटी झाडे तोडणे व पाण्याचा उपसा मनपाद्वारे करण्यात येत आहे. वृक्षतोड सुरु असून चिन्हित वृक्षांपैकी ६६ वृक्षांचे संवर्धन करण्यात येणार आहे. यातील २९ वृक्ष हे वारसा श्रेणीतील असून ३७ वृक्षांच्या बुंध्याचा आकार १६ सेंटीमिटर पेक्षा जास्त आहे.

टॅग्स :nagpurनागपूर