शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

शहरात तीन नवीन पूल

By admin | Updated: June 15, 2014 00:36 IST

शहरात तीन नव्या पुलांची भर पडणार आहे. त्यात झिरो माईल ते पागलखाना चौक, अमरावतीमार्गावर मारूती सेवा शोरूम ते आठवा मैल दरम्यान उड्डाण पूल, खापरी रेल्वे उड्डाण पुलाचे चौपदरीकरण आदीचा समावेश आहे.

गडकरींनी घेतला आढावा : खापरी उड्डाणपूलही चार पदरीनागपूर : शहरात तीन नव्या पुलांची भर पडणार आहे. त्यात झिरो माईल ते पागलखाना चौक, अमरावतीमार्गावर मारूती सेवा शोरूम ते आठवा मैल दरम्यान उड्डाण पूल, खापरी रेल्वे उड्डाण पुलाचे चौपदरीकरण आदीचा समावेश आहे. तसेच झिरो माईल ते आटोमाटीव्ह चौकपर्यंत चारपदरी रस्त्याचा प्रस्ताव करण्याच्या सूचना नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एमएचएआय) अधिकाऱ्यांना दिल्या. आऊटर रिंगरोडचे ६१ किलोमीटरचे काम संथ गतीने सुरु असल्याबाबत नाराजी व्यक्त करताना गडकरी यांनी काम गतीने करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. शहरातील भाजपच्या चार आमदारांसह अधिकारी या मार्गाची पाहणी करणार असून त्या नंतर यात आवश्यक बदल करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. खापरी पुलाचे चारपदरीकरून यातील एक मार्ग मनिषनगर भागाकडे वळता करण्यासंदर्भातला प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही दिल्या. बुट्टीबोरी- वर्धा ते सांगली तर्यंतचा मार्ग चारपदरी करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव करण्यात येणारआहे. पारडी पुलाच्या कामाला गती देण्यात येणार आहे. नागपूर - जबलपूर चारपदरी रस्त्याकरता वन विभागाकडून अडचन निर्माण करण्यात येत असल्याने गडकरींनी नाराजी व्यक्त केली व सर्व प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश दिले.राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण व त्यावरील पुलाच्या बांधकामासठी प्रस्ताव तत्काळ पाठवण्याच्या सूचना गडकरींनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. शहरातील पुल व रस्त्याची कामे अधिक चांगली कशी होतील याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे आणि प्रस्तावित पुलाचे बांधकाम करताना त्याचा नव्याने आराखडा तयार करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. गडकरी यांनी दिलेल्या दिशानिर्देशानुसार पुल आणि रस्त्याचे बांधकाम ‘मॉडेल’ स्वरुपात तयार केले जातील. त्यासाठी नव्याने डिझाईन तयार करताना सर्व तांत्रिक बाबींचा अभ्यास करून अहवाल सादर केला जाईल, असे महामार्ग प्राधिकरणाचे संचालक एम. चंद्रशेखर यांनी सांगितले. बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दिल्लीचे सदस्य सुधीर कुमार, मुख्य सरव्यवस्थापक एन.के. जैन, प्रकल्प संचालक एम. चंद्रशेखर उपस्थित होते. (प्रतिनिधी)