शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाईन फ्लू’चे आणखी तीन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 01:04 IST

स्वाईन फ्लू नियंत्रणात येत नसल्याचे चिन्ह दिसून येत आहे. सोमवारी पुन्हा तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून नागपूर विभागात मृताचा आकडा ८४ वर पोहचला आहे.

ठळक मुद्देमृत्यूचा आकडा पोहोचला ८४ वर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वाईन फ्लू नियंत्रणात येत नसल्याचे चिन्ह दिसून येत आहे. सोमवारी पुन्हा तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून नागपूर विभागात मृताचा आकडा ८४ वर पोहचला आहे. तर रुग्णांची संख्या ४४१ झाली आहे. धक्कादायक म्हणजे, सध्याच्या घडीला शासकीयसह खासगी रुग्णालयात तब्बल ७६ रुग्ण उपचार घेत आहेत.सुजाता वराडे (४७) रा. कालमेघ ले-आऊट कळमेश्वर, रामचंद्र इंगळे (६२) रा. सौरभ कॉलनी अमरावती व निळकंठ कासारे (७०) रा. कडू ले-आऊट पंचवटी काटोल, असे मृताचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, निळकंठ कासारे यांचा मृत्यू धंतोली येथील एका खासगी इस्पितळात सोमवारी झाला. तर सुजाता वराडे व रामचंद्र इंगळे यांचा मृत्यू २९ सप्टेंबर रोजी एका खासगी इस्पितळात झाले. या मृत्यूला घेऊन नागपूर विभागात ८४ मृत्यूची नोंद झाली आहे. यात एकट्या नागपूर शहरातील ३६ मृत्यू आहेत. सोमवारी शहरातील सहा व ग्रामीण भागातील दोन, अकोला येथील एक व मध्य प्रदेशातील एक असे दहा रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. कळमेश्वर, काटोल या नागपूरच्या ग्रामीण भागात रुग्ण दिसून येऊ लागल्याने हा रोग पसरण्याची शक्यता डॉक्टर वर्तवित आहे. यामुळे सर्दी, खोकला, ताप अंगावर काढू नका, असा सल्ला डॉक्टर देत आहे.खासगीसह शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णसध्याच्या स्थितीत नागपुरातील बहुसंख्य मोठे खासगी इस्पितळांमध्ये व मेयो, मेडिकल या शासकीय रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लूचे मोठ्या संख्येत रुग्ण उपचार घेत आहेत. आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार सध्याच्या स्थितीत मेयोमध्ये १४ तर मेडिकलमध्ये १५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर १६ खासगी इस्पितळांमध्ये ४७ रुग्ण उपचार घेत आहेत.