शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दोन बहिणींसह तीन जणींवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 23:31 IST

युवतीसह तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना अजनी व सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. दोन अल्पवयीन बहिणींवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपी हा पीडित मुलींच्या वडिलांचा मित्र आहे.

ठळक मुद्देदोन वेगवेगळ्या घटनावडिलाच्या मित्रानेच केला घात

आॅनलाईन लोकमत 

नागपूर : युवतीसह तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना अजनी व सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. दोन अल्पवयीन बहिणींवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपी हा पीडित मुलींच्या वडिलांचा मित्र आहे. अत्याचाराच्या दोन्ही घटनेत पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.पहिली घटना अजनी ठाण्याच्या हद्दीतील असून, पीडित बहिणी ९ व १० वर्षाच्या आहे. त्यांचे वडील मजुरी करतात. आई सोडून गेली आहे. वडिलांची श्रमजीवीनगर येथील ४१ वर्षीय रूपेश प्रभाकर कांबळे याच्याशी मैत्री होती. २६ नोव्हेंबरला पीडित मुलींच्या वडिलांनी कांबळे याला घरी जेवायला बोलाविले होते. त्यांनी जेवणापूर्वी दारूही घेतली. दारू जास्त झाल्याने पीडित मुलींचे वडील झोपून गेले. हीच संधी साधत आरोपीने मुलींवर अत्याचार केला. पीडित मुलींनी झालेला प्रकार वडिलांना सांगितला. वडिलांनी तत्काळ आरोपीला फोन लावला मात्र त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी सोमवारी वडिलांनी अजनी पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून, आरोपी कांबळे याला अटक केली आहे.दुसरी घटना सदर येथील मंगळवारी कॉम्प्लेक्स येथे घडली. पीडित १६ वर्षीय विद्यार्थिनी असून, तिची गोवा कॉलनी, सदर येथील रहिवासी १९ वर्षीय जितेश शरद शंकरकर याच्याशी मैत्री होती. ३ डिसेंबरला जितेश तिला फिरायला घेऊन गेला. अमरावती रोडवरील एका हॉटेलात जेवण केल्यानंतर वाकी येथे घेऊन गेला. तेथून रात्री परतल्यानंतर मंगळवारी कॉम्प्लेक्समध्ये त्याने तिच्यावर अत्याचार केला. रात्रभर तिला घेऊन तो फिरत होता. दुसऱ्या दिवशी दुपारी त्याने मुलीला तिच्या मैत्रिणीकडे सोडून दिले. मुलगी न परतल्यामुळे घरच्यांनी पोलिसांना माहिती दिली. मुलीच्या घरच्यांना ती जितेशसोबत गेल्याची माहिती मिळाली. जितेशला विचारणा केल्यानंतर त्याने मुलीची माहिती दिली. मुलीने घरच्यांना घटनेची माहिती दिली. तिच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल क रून, त्याला अटक केली.मंगळवारी कॉम्पलेक्स गुन्हेगारांचा अड्डासदर मंगळवारी कॉम्प्लेक्समध्ये गेल्या तीन महिन्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची दुसरी घटना आहे. पहिल्या घटनेनंतर पोलिसांनी कॉम्प्लेक्सच्या पदाधिकाऱ्यांना सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले होते. काही दिवस सुरक्षा रक्षक ठेवण्यात आला. नंतर परिस्थिती जैसे थेच आहे. रात्रीच्या वेळी कॉम्प्लेक्सचा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक दुरुपयोग करतात.काकाला बोलावू नकाकांबळे याने दोन्ही बहिणींवर अत्याचार के ल्यामुळे त्या भयभीत झाल्या होत्या. सुरुवातीला त्या वडिलांपुढे काहीच सांगू शकल्या नाही. वडिलांना त्या रूपेशकाकाला बोलावू नका, ते घाणेरडे आहे असे म्हणाल्या. मुलींच्या या बोलण्यावरून वडिलांना संशय आला.

टॅग्स :Rapeबलात्कारnagpurनागपूर