शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

एकाच कुटुंबातील तिघे विहिरीत पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 14:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घराजवळच्या विहिरीजवळची जमिन अचानक खाली गेल्यामुळे २ वर्षांच्या चिमुकल्यासोबत एकाच कुटुंबातील तिघे विहिरीत पडले. त्यांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आणखी दोघे विहिरीत अडकून पडले. आज सकाळी ११.१५ च्या सुमारास मानकापूरच्या गायत्रीनगरात ही घटना घडली. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चौघांना बाहेर काढण्यात आले. ...

ठळक मुद्देजमिन खाली गेलीमानकापुरातील घटना : बचावकार्य तेजीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घराजवळच्या विहिरीजवळची जमिन अचानक खाली गेल्यामुळे २ वर्षांच्या चिमुकल्यासोबत एकाच कुटुंबातील तिघे विहिरीत पडले. त्यांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आणखी दोघे विहिरीत अडकून पडले. आज सकाळी ११.१५ च्या सुमारास मानकापूरच्या गायत्रीनगरात ही घटना घडली. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चौघांना बाहेर काढण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर मुलाला विहिरीतून बाहेर काढणाचे प्रयत्न सुरू होते.गायत्रीनगर झिंगाबाई टाकळीत राजेश कुंभारे यांचे घर आहे. तेथे दीड वर्षांपासून सुधीर चौधरी यांचा परिवार भाड्याने राहतो. घराच्या अंगणात विहिर आहे. सुधीर यांची पत्नी सुरेखा, सुरेखांच्या मावशी मंदाताई महाजन (वय ६०) आणि दोन वर्षांचा चिमुकला अंकूश या विहिरीजवळ बसून होते. जमीन पावसामुळे भुसभुशीत झाली असल्यामुळे अचानक ही जमीन खाली गेली. त्यामुळे अंगणात (विहिरीच्या बाजुला) गप्पा करीत असलेल्या सुरेखा, मंदाताई आणि अंकूश विहिरीत पडले. मोठा आवाज आल्यामुळे घरात बसलेले सुधीर चौधरी आणि त्यांचे वडील यादवराव चौधरी (वय ७०) धावले. त्यांना पोहणे येत असल्यामुळे त्यांनी सुरेखा आणि मंदाताई यांना बाहेर काढले. चिमुकला अंकूश मात्र त्यांच्या हाती लागला नाही. विहिरीच्या आजुबाजूची जमिन पोकळ असल्यामुळे अंकूशला शोधण्याच्या प्रयत्नात सुधीर आणि त्यांचे वडीलही चिखलात फसले. दरम्यान, आरडाओरड ऐकून शेजारची मंडळी धावली. कर्णोपकर्णी वा-यासारखी या घटनेची माहिती परिसरात पसरली. त्यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ निर्माण झाली. मोठ्या संख्येत नागरिक घटनास्थळी धावले. त्यांनी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना बोलविले. अग्निशमन दलाचा ताफा आणि मानकापूर पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी बचाव कार्य सुरू केले. दोन तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर सुनील चौधरी व त्यांच्या वडिलांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले. तत्पूर्वी, सुरेखा आणि मंदाताई यांनाही बाहेर काढण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. दरम्यान, चिमुकल्या अंकूशचा शोध घेणे सुरू होते. त्याला बाहेर काढण्यासाठी मोठमोठे पंप लावून संपूर्ण पाणी बाहेर फेकण्यात आले. त्यानंतर जेसीबीच्या मदतीने मलबाही बाहेर फेकण्यात आला. मात्र, अंकूश हाती लागला नव्हता. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

टॅग्स :Accidentअपघात