शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या ट्रॉमा केअर सेंटरला तीन कोटींचे व्हेन्टिलेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 23:07 IST

विदर्भासह, आजूबाजूच्या राज्यातून गंभीर आजाराचे रुग्ण मोठ्या आशेने मेडिकलमध्ये येतात. परंतु वाढत्या रुग्णांच्या संख्येत उपकरणांची संख्या तोकडी असल्याने रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. विशेषत: मेडिकलमध्ये खाटांची संख्या १५०० वर गेली असताना व्हेन्टिलेटर २२ आहेत. यातही ‘ट्रॉमा केअर सेंटर’मध्ये ७२ खाटांच्या तुलनेत केवळ १७ व्हेन्टिलेटर आहेत. गेल्या काही महिन्यांपासून वाढीव व्हेन्टिलेटरचा प्रस्ताव शासनाकडे पडून होता, नुकतेच याला मंजुरी मिळाल्याने तीन कोटी किमतीचे २० व्हेन्टिलेटर उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्दे२० वर यंत्रांची खरेदी ; रुग्णांना मिळणार दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भासह, आजूबाजूच्या राज्यातून गंभीर आजाराचे रुग्ण मोठ्या आशेने मेडिकलमध्ये येतात. परंतु वाढत्या रुग्णांच्या संख्येत उपकरणांची संख्या तोकडी असल्याने रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. विशेषत: मेडिकलमध्ये खाटांची संख्या १५०० वर गेली असताना व्हेन्टिलेटर २२ आहेत. यातही ‘ट्रॉमा केअर सेंटर’मध्ये ७२ खाटांच्या तुलनेत केवळ १७ व्हेन्टिलेटर आहेत. गेल्या काही महिन्यांपासून वाढीव व्हेन्टिलेटरचा प्रस्ताव शासनाकडे पडून होता, नुकतेच याला मंजुरी मिळाल्याने तीन कोटी किमतीचे २० व्हेन्टिलेटर उपलब्ध होणार आहे.रुग्ण अत्यवस्थ झाला की श्वासोच्छवास घेण्यात अडचण होते. अशावेळी त्याला कृत्रिम श्वासोच्छवास दिला जातो. हे काम अत्याधुनिक यंत्र व्हेन्टिलेटर करते. मेडिकलमध्ये हे यंत्र अतिदक्षता विभागात आठ, शस्त्रक्रियेच्या रिकव्हरी वॉर्डात तीन, पेडियाट्रिक विभागात दोन, मेडिसीन व सर्जरी आकस्मिक विभागात प्रत्येकी दोन तर स्वाईन फ्लू वॉर्डात पाच उपलब्ध करून देण्यात आले आहे. यातील पाच नादुरुस्त आहेत. उर्वरित व्हेन्टिलेटर रुग्णसेवेत आहेत. व्हेन्टिलेटर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना ऐनवेळी धावपळ करावी लागते. काहींवर हाताने एक पंप दाबून कृत्रिम श्वासोच्छवास देण्याची वेळ येते. याला वैद्यकीय भाषेत ‘बॅग अ‍ॅण्ड मास्क व्हेन्टिलेशन’ असे म्हणतात. यासाठी २४ तास कुणीतरी हा पंप दाबावा लागतो. याची दखल घेत मेडिकल प्रशासनाने व्हेन्टिलेटर खरेदीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. यात ट्रॉमा केअर सेंटरसाठी २० ‘अ‍ॅडल्ट’ आणि ‘पेडियाट्रिक व्हेन्टिलेटर’ होते. अखेर या यंत्र खरेदीसाठी शासनाने ३ कोटी ३८ लाख रुपयाला मंजुरी दिल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. या यंत्रासोबतच १२ लाख किमतीचे २० ‘मोटराईज्ड फावलर बेड’ तर नऊ लाख किमतीचे २० ‘मल्टीपॅरा मॉनिटर’च्या खरेदीलाही मान्यता देण्यात आली आहे. लवकरच हे उपकरण रुग्णसेवेत उपलब्ध होईल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयnagpurनागपूर