लकडगंजमधील डॉ. राम मनोहर लोहिया शाळेच्या वॉल कंपाउंडला लागून असलेल्या ग्रीलला स्कार्फ बांधून गळफास लावलेल्या अवस्थेत एका अनोळखी तरुणचा मृतदेह रविवारी रात्री ७.५० च्या सुमारास पोलिसांना आढळला. तो कोण, कुठला आणि त्याने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, त्याचा पोलीस तपास करीत आहेत.
दुसरी घटना कपिलनगरातील उप्पलवाडी टायर कंपनी समोर घडली. चहा टपरीच्या लाकडी बल्लीला प्लास्टिक पॅकिंगच्या पट्टीने अनिल कवडूजी क्षीरसागर (वय ५६) यांनी गळफास घेतला. विश्वजीत विलास मेश्याराम यांनी दिलेल्या माहितीवरून कपिलनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
अशाच प्रकारे हुडकेश्वरमधील सच्चिदानंद नगरात राहणारे अविश नारायण शेंडे (वय ४२) यांनी रविवारी पहाटे ५ च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. आशीष नारायण शेंडे (वय ३८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. शेंडे यांच्या आत्महत्येमागचे कारण पोलीस शोधत आहेत.
----
विहिरीत पडून महिलेचा मृत्यू
नागपूर : पाय घसरून विहिरीत पडल्याने शोभा योगेशप्रसाद वाजपेयी (वय ५५) यांचा करुण अंत झाला. रविवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास नरसाळा भागात ही घटना घडली. योगेशप्रसाद ओमकारप्रसाद वाजपेयी (वय ७०) यांनी दिलेल्या सूचनेवरून हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
----