शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन हजार लोकांनी डाऊनलोड केले नागपूर लाईव्ह सिटी अ‍ॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 21:29 IST

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढकाराने तयार करण्यात आलेल्या ‘नागपूर लाईव्ह सिटी’ अ‍ॅपला आठवडाभरातच प्रचंड प्रतिसाद मिळाला. तीन हजार ५०० नागपूरकरांनी अ‍ॅप डाऊनलोड केले आहे.

ठळक मुद्देतुकाराम मुंढे यांचा पुढाकार : प्राप्त ७०० तक्रारींपैकी ४१९ चे निराकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कार्यालयाच्या फेऱ्या न मारता लोकांना एका क्लिकवर त्यांच्या समस्यांचे समाधान मिळावे. या उद्देशातून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढकाराने तयार करण्यात आलेल्या ‘नागपूर लाईव्ह सिटी’ अ‍ॅपला आठवडाभरातच प्रचंड प्रतिसाद मिळाला. तीन हजार ५०० नागपूरकरांनी अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. आतापर्यंत ७०० च्या वर तक्रारी अ‍ॅपच्या माध्यमातून प्राप्त झाल्या आहेत.विशेष म्हणजे प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी अर्ध्यांपेक्षा अधिक तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. त्याची माहितीही संबंधित नागरिकांना अ‍ॅपच्या माध्यमातूनच देण्यात आली. तुकाराम मुंढे यांनी सात दिवसापूर्वी नागपूरकरांसाठी नागपूर लाईव्ह सिटी अ‍ॅप लाँच केले. शहरातील कुठलीही व्यक्ती मूलभूत सोयीसुविधांविषयी कुठलीही तक्रार या अ‍ॅपच्या माध्यमातून करू शकतात.या अ‍ॅपमुळे आता नागरिकांना महापालिकेशी संबंधित पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा, शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता, मालमत्ता कर, जन्म-मृत्यू नोंदणी, धोकादायक इमारती, रस्त्यावर पडलेली झाडे, मलवाहिनी, उद्यान आदीसंदर्भातील तक्रारी अ‍ॅपच्या माध्यमातून करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. केवळ सात दिवसात ३,६०० नागपूरकरांनी अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. दररोज ५०० नागपूरकर अ‍ॅप डाऊनलोड करीत असून, दिवसाला १०० तक्रारी प्राप्त होत आहेत. आतापर्यंत एकूण ७५२ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ४१९ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. तर अधिकाऱ्यांना नोटीसविशेष म्हणजे अ‍ॅपच्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारींवर तुकाराम मुंढे यांचे नियंत्रण असून, ते दररोज याचा आढावा घेतात. संबंधित तक्रारींची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांना दिली असून, निर्धारित वेळेच्या आत तक्रारीचे निराकरण झाले नाही तर अ‍ॅपच्या माध्यमातूनच संबंधित अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस जाते. हे अ‍ॅप उपयुक्त असून तक्रारींचे निराकरण करण्यासाठी नागरिकांनी या अ‍ॅपचा वापर करावा, असे आवाहन मुंढे यांनी केले आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप