शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या इंदोरा बाराखोली येथील खुनात तिघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:08 IST

सत्र न्यायालयाने मंगळवारी तीन आरोपींना खुनाच्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरवून जन्मठेप व प्रत्येकी ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश ए. एस. काझी यांनी हा निर्णय दिला. ही घटना जरीपटका पोलिसांच्या हद्दीतील आहे.

ठळक मुद्देसत्र न्यायालयाचा निर्णय : प्रत्येकी ५० हजार रुपये दंड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने मंगळवारी तीन आरोपींना खुनाच्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरवून जन्मठेप व प्रत्येकी ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश ए. एस. काझी यांनी हा निर्णय दिला. ही घटना जरीपटका पोलिसांच्या हद्दीतील आहे.विश्वास राजेश दहीवले (३०), सूरज राजू मानवटकर (२३) व कमलेश कालीचरण पाटील (३०) अशी आरोपींची नावे आहेत. दहीवले न्यू इंदोरा, मानवटकर महादुला तर, पाटील पुलगाव, जि. वर्धा येथील रहिवासी आहे. मयताचे नाव राकेश बापुराव रामटेके (४५) होते. तो बाराखोली येथे रहात होता. २९ सप्टेंबर २०१५ रोजी रात्री ११ च्या सुमारास आरोपींनी रामटेकेला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यावरून त्यांचा रामटेकेसोबत वाद झाला. दरम्यान, आरोपींनी रामटेकेला लाकडी स्टम्प व दांड्याने जबर मारहाण केली. त्यामुळे रामटेके गंभीर जखमी होऊन ठार झाला. रामटेकेची पत्नी वैशालीने आरोपींविरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून तिन्ही आरोपींना ३० सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक बी. पी. सावंत यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकारच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील अभय जिकार यांनी काम पाहिले. 

 

टॅग्स :Life Imprisonmentजन्मठेपSessions Courtसत्र न्यायालयMurderखून