शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

‘सीजीओ कॉम्प्लेक्स’ला बॉम्बने उडविण्याची धमकी, सुरक्षायंत्रणांची धावाधाव

By योगेश पांडे | Updated: June 6, 2025 16:55 IST

‘पेसो’च्या कार्यालयात ई-मेलच्या माध्यमातून देण्यात आली धमकी : स्फोटके न आढळल्याने सुटकेचा नि:श्वास

योगेश पांडे - नागपूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सेमिनरी हिल्स येथील सीजीओ कॉम्प्लेक्सला बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली होती. इमारतीतच असलेल्या ‘पेसो’च्या (पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन) कार्यालयाला ई-मेलच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली. धमकीची माहिती समोर येताच शुक्रवारी नागपूर पोलिसांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी संपूर्ण सीजीओ कॉम्प्लेक्सची कसून झडती घेतली. मात्र पोलिसांना कोणतेही स्फोटके सापडली नाहीत. धमकी म्हणजे खोडसाळपणा असल्याचे स्पष्ट होताच सुरक्षायंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. विविध स्फोटक कारखान्यांच्या सुरक्षा ऑडिट व त्यांना दिशानिर्देश जारी करण्याचे काम ‘पेसो’च्या माध्यमातून होत असते. शुक्रवारी ‘पेसो’च्या कार्यालयाला ई-मेलद्वारे संबंधित धमकी मिळाली. कार्यालयासह दुपारी अडीच वाजेपर्यंत सीजीओ कॉम्प्लेक्स उडविण्यात येईल असे त्यात नमूद होते. संबंधित कॉम्प्लेक्समध्ये अनेक महत्त्वाची सरकारी कार्यालये आहेत. याची माहिती तातडीने पोलीस व इतर सुरक्षायंत्रणांना देण्यात आली. गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे पथक, बॉम्बशोधक व नाशक पथक तेथे पोहोचले. त्यांनी पूर्ण कॉम्प्लेक्सची झडती घेतली. मात्र तेथे कुठलीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. सर्व सुरक्षा तपासणी पूर्ण झाली आहे आणि सध्या इमारत पूर्णपणे सुरक्षित आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

कार्यालयांमधील कामांना फटकासंबंधित इमारतीत मोठ्या प्रमाणावर केंद्र शासनाशी निगडीत सरकारी कार्यालये आहेत. बीडीडीएस पथक पोहोचल्यावर काही कार्यालयांतील कर्मचारी-अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. त्यामुळे खळबळ उडाली होती. कर्मचाऱ्यांमध्ये या धमकीसंदर्भात विविध चर्चांना ऊत आला होता व कामे खोळंबली होती. मात्र दुपारनंतर सर्वच कार्यालयांत सुरळीतपणे काम सुरू झाले.

अगोदर हायकोर्ट, आता सीजीओ

काही दिवसांअगोदर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातदेखील बॉम्ब असल्याची धमकी प्राप्त झाली होती. एका निनावी मेलद्वारे ती धमकी आली होती. परत पेसो व सीजीओ कॉम्प्लेक्सबाबतदेखील तयाच प्रकार घडला आहे. ईमेलद्वारे आलेली धमकी कोणाकडून आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, नागपूर सायबर सेलला अलर्ट करण्यात आले असून, ईमेलचा स्त्रोत शोधण्यासाठी तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे. संबंधित ईमेलचा आयपी अॅड्रेस, सर्व्हर लोकेशन यांचा मागोवा घेण्यात येत आहे.

टॅग्स :nagpurनागपूर