लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय व खासगी नोकरी न दिल्यास बॉम्बहल्ला करण्याची धमकी देणारे एक पत्रक नागपुरातील विद्यापीठ परिसरात असलेल्या बसस्थानकावर सोमवारी सकाळी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.यमराजाचे बोट बॉम्बच्या रिमोटवर आहे, या धमकीला गांभीर्याने घेतले नाही तर तुमच्या कुटुंबियांना देवाघरी पाठवले जाईल अशा आशयाचा मजकूर या पत्रकावर लिहिला आहे. ही एकूण चार पत्रके असून ती विद्यापीठासमोरील बसस्थानकावर लावण्यात आली होती. ही पत्रके काही नागरिकांच्या निदर्शनास आली आणि त्याची सूचना पोलिसांना देण्यात आली. यामागे कुठली विद्यार्थी संघटना असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास पोलिसांनी ही पत्रके काढून ताब्यात घेतली.
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना नोकरी न दिल्यास नागपुरात बॉम्बहल्ल्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 16:15 IST
खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय व खासगी नोकरी न दिल्यास बॉम्बहल्ला करण्याची धमकी देणारे एक पत्रक नागपुरातील विद्यापीठ परिसरात असलेल्या बसस्थानकावर सोमवारी सकाळी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना नोकरी न दिल्यास नागपुरात बॉम्बहल्ल्याची धमकी
ठळक मुद्देनागपूर विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील परिसरातील बसस्थानकावर पोस्टर्स