शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

चूक अधिकाऱ्यांची, फटका मागासवर्गीय विद्यार्थ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 11:43 IST

Nagpur News अभिमत आणि खासगी विद्यापीठात व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या हजारो मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मागील पाच वर्षांपासून शासनाच्या फ्रीशिप योजनेपासून वंचित राहावे लागत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देपाच वर्षांपासून हजारो विद्यार्थी ‘फ्रीशिप’पासून वंचित मंत्रिमंडळाचा निर्णय अधिकाऱ्यांनी बदलविला

आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अभिमत आणि खासगी विद्यापीठात व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या हजारो मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मागील पाच वर्षांपासून शासनाच्या फ्रीशिप योजनेपासून वंचित राहावे लागत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. सामाजिक न्याय विभागातील काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे हा प्रकार घडला हे विशेष.

आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनातर्फे २००६ पासून शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती (फ्रीशिप) योजना सुरु केली. सुरुवातीला राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत शासकीय तसेच अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतने आणि शासकीय विद्यापीठात विनाअनुदानित तत्त्वावर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फ्रीशिप दिली जाते. १७ मार्च १०१६ मध्ये पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिमत विद्यापीठ व खासगी विद्यापीठातील अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाही ही योजना लागू ठेवण्यास मान्यता प्रदान करण्यात आली. इतकेच नव्हे तर या याेजनेसाठी यापुढे दरवर्षी मंत्रिमंडळाची मान्यता घेण्याची गरज राहणार नाही, असा धोरणात्मक निर्णय सुद्धा घेण्यात आला. परंतु मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर ३१ मार्च २०१६ रोजी सामाजिक न्याय विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. त्यात खासगी विद्यापीठ व अभिमत विद्यापीठांना ही योजना लागू राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. एकप्रकारे मंत्रिमंडळाचा निर्णय अधिकाऱ्यांनी बदलविला. त्यामुळे मागील पाच वर्षांपासून हजारो मागासवर्गीय विद्यार्थी फ्रीशिपपासून वंचित राहिले आहेत.

 

- राज्याबाहेर शिकणारे महाराष्ट्रातील विद्यार्थीही वंचित

फ्रीशिपची योजना ही राज्याबाहेर शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाही लागू होती; परंतु २०१६ पासून ती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातीलच महाराष्ट्राबाहेर शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाही मोठा फटका बसत आहे.

- राज्यपाल-मुख्यमंत्र्यांना पत्र

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानंतरही जी.आर.मध्ये त्याचा अंतर्भाव झालेला नाही. ही अधिकाऱ्यांची चूक म्हणावी की जाणिवपूर्वक केलेला प्रकार होय. काहीही असले तरी या चुकीमुळे हजारो माागासवर्गीय विद्यार्थ्यांचे उच्चशिक्षण धोक्यात आले आहे. यासंदर्भात आम्ही राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यांना फ्रीशिप मधील ही त्रुटी लक्षात आणून दिली आहे. तसेच खासगी व अभिमत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनाही फ्रीशिप योजना लागू करावी, तसेच राज्याबाहेर शिक्षण घेणाऱ्यांनाही ती मिळावी, अशी मागणी केली आहे.

डॉ. सिद्धांत भरणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट्स फेडरेशन

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र