शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

तुर्कस्तानातून नागपुरात आल्या हजारो पळसमैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 10:06 IST

तुर्कस्तान, उजबेकीस्तान, पूर्वेकडच्या युरोप येथून हजारो किलोमीटरचे अंतर कापून देशभरात हजारो पाहुणे आले आहेत. सकाळी आणि सायंकाळी आकाशात उडणाऱ्या या पाहुण्यांचे थवेच्या थवे दिसून येत आहेत.

ठळक मुद्देकाही थव्यांचा झाला परतीचा प्रवास सुरू

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तुर्कस्तान, उजबेकीस्तान, पूर्वेकडच्या युरोप येथून हजारो किलोमीटरचे अंतर कापून देशभरात हजारो पाहुणे आले आहेत. सकाळी आणि सायंकाळी आकाशात उडणाऱ्या या पाहुण्यांचे थवेच्या थवे दिसून येत आहे. ‘रोझी पॅस्टर’ असे या पाहुण्या पक्ष्याचे इंग्रजीतील नाव. मराठीत भोरडी, गुलाबी मैनाही म्हणतात. मैनेसारखा दिसणारा हा गुलाबी पक्षी आहे.युरोपमधील स्थलांतरित पक्षी उत्तरेकडून दक्षिणेकडे येतात. परंतु पळस मैना हा पक्षी पश्चिमेकडून पूर्वेकडे स्थलांतरित करतो. सध्या नागपूरमध्ये आलेले हे पक्षी परतीच्या प्रवासावर आहेत. नागपुरात आठ ते दहा दिवस मुक्काम करून ते निघून जातात. परत दुसरे थवे त्यांची जागा घेतात.या पक्ष्यांना प्रवासाच्या दरम्यान खाद्य पाहिजे असते. लांब पल्ल्याचा प्रवास असल्याने वजन वाढवून आरामही पाहिजे असतो. यासाठी काही दिवस ते थांबा घेतात. याला पक्षी निरीक्षक ‘फिडिंग अ‍ॅण्ड रेस्टिंग स्टॉप’ असे म्हणतात. या पक्ष्याचे डोके, गळा आणि छाती तसेच पंख व शेपटी काळ्या रंगाची, पाठ व पोट गुलाबी रंगाचे असते. डोके आणि मानेवर शेंडे असतात. नर-मादी दिसायला सारखेच असतात.ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ. अनिल पिंपळापुरे यांनी सांगितले, पूर्वेकडील भागात थंडी असल्याने हे पक्षी भारतात येतात. नागपूरमध्ये हे पक्षी मेडिकल परिसरसह अनेक ठिकाणी रात्रीच्या मुक्कामाला आहेत. दिवसा हे पक्षी शहरालगत जंगलात राहतात. पळस, वड, पिंपळ, काटेसावरी, सालमली व पांगाऱ्याच्या झाडांची फळे व फुलांमधील मध हे आवडते खाद्य आहे. त्यांच्या येण्याची व पळस फुले बहरण्याची वेळ एकच असल्याने या पक्ष्याला ‘पळस मैना’ही म्हणतात.

सर्वात आधी येणारा स्थलांतरित पक्षीइतर स्थलांतरित पक्ष्यांच्या तुलनेत हा पक्षी सर्वात आधी, म्हणजे आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये येऊन नंतर दक्षिण भारत व पुढे श्रीलंकेपर्यंत जातो. परतीच्या प्रवासात ते परत दिसतात. मात्र त्यावेळी ते मोठ्या झुंडीत येतात.

पक्ष्यांची जागा ठरलेली असतेभोरड्या या पक्ष्यांची जागा वर्षानुवर्षे ठरलेली असते. त्यांची टीम ठरलेली असते. एका टीममध्ये १०० ते ५०० संख्येत हे पक्षी असतात. त्यांचा परतीचा मार्गही ठरलेला असतो. याला इंग्रजीत ‘फ्लायवेज’ म्हणतात. या ‘हायवे’ला पकडून एक-एक टीम जायला लागते. साधारण एप्रिलपासून या पक्ष्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो, असेही डॉ. पिंपळापुरे म्हणाले.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य