शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

नागपुरात महिला सक्षमीकरणाकरिता आले हजारावर मुलींचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 12:47 IST

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण नागपूर विभागाने महिला सक्षमीकरणासाठी नोकरी मेळावे घेण्याचा प्रशंसनीय उपक्रम सुरू केला आहे. राज्यातील हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे.

ठळक मुद्देजागा केवळ २८०तीन कंपन्यांनी उपलब्ध केल्या संधी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण नागपूर विभागाने महिला सक्षमीकरणासाठी नोकरी मेळावे घेण्याचा प्रशंसनीय उपक्रम सुरू केला आहे. राज्यातील हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. त्यांतर्गत रविवारी झाशी राणी चौकाजवळील सेवासदन विद्यालयात नागपूर, चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यातील एमसीव्हीसी व आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण मुलींसाठी नोकरी मेळावा घेण्यात आला. त्यात २८० नोकऱ्यांसाठी हजारावर मुलींनी अर्ज सादर केले.मेळाव्यासाठी हिंगणघाट (वर्धा) येथील पी. व्ही. टेक्सटाईल्सने २००, मिहानमधील फ्युचर सप्लाय चेन कंपनीने ६० तर, बुटीबोरी येथील स्पेस वूड कंपनीने २० नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या. कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी मुलींचे अर्ज स्वीकारून त्यांच्या प्राथमिक मुलाखती घेतल्या. अर्जांची पडताळणी केल्यानंतर सर्वोत्तम मुलींना नोकरी दिल्या जाणार आहेत.व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण नागपूर विभागाचे सहसंचालक चंद्रकांत निनाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना हा मेळावा यशस्वी झाल्यामुळे आनंद व्यक्त केला. नागपूर विभागात ७६ आयटीआय व १६६ एमसीव्हीसी महाविद्यालये आहेत. त्यामुळे मेळाव्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. असे मेळावे घेण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. पुणे व औरंगाबाद येथे नोकऱ्या उपलब्ध आहेत, पण विदर्भातील मुली तिकडे जात नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी विदर्भातच संधी उपलब्ध करून देण्याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पुढील मेळावा २४ जानेवारी रोजी वर्धा येथे होणार आहे असे त्यांनी सांगितले.हा मेळावा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण नागपूर विभाग, अनुलोम-अनुगामी लोकराज्य महाभियान, पुणे सेवासदन संस्था व यशस्वी अकॅडमी फॉर स्कील यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. सीआरपीएफच्या सहायक कमांडंट स्वाती तांदळे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. चंद्रकांत निनाळे, अनुलोमचे विदर्भ विभाग प्रमुख हेमंत ब्राह्मणकर, जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी सुधा ठोंबरे, सेवासदन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका हेमलता अकर्ते हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सीमा महाजन यांनी संचालन तर, शाल्मली पवार यांनी आभार व्यक्त केले.

टॅग्स :Womenमहिला