टेकाडी ग्रा.पं.च्या कोळसा खाण क्रमांक ४ वस्तीतील रहिवासी असणारे शिवकुमार नागमण मनहरे, गंगाप्रसाद राजू जलहरे, कन्हैयालाल रामकेवल चंदन यांचा १२ जुलै २०१९ रोजी मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला होता. या मजुरांच्या कुटुंबीयांची यादव यांनी भेट घेतली. यानंतर त्यांचे नाव रेशन कार्डमध्ये समाविष्ट करून त्यांना धान्य मिळवून दिले. तसेच त्यांच्या घरातील महिला सदस्यांची नावे ग्रामपंचायतच्या बीपीएल यादीत असल्यास कुटुंब आर्थिक मदत योजना व संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभ मिळवून देण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी वीर सिंग, संजय गांधी निराधार समिती योजना सदस्य सचिन खागर, ग्रा.पं. सदस्य शाकीर सिद्दीकी, शंकर होलगिरे, चंद्रकांत नंदनवार, शिवगोपाल प्रजापती, बशिष्ठ यादव, किसन सिंग, अज्जू खान, सुनीता यादव, बबलू सिंग, करण शर्मा, विकास अहिरवार, आकाश बनकर, सोनम कुमार सिंह, अक्षय सहारे, रजनिश वाघमारे आदी उपस्थित होते.
‘त्या’ तीन कुटुंबांना मिळाला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:09 IST