शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

‘त्या’ पतंगबाजांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 21:01 IST

मकरसंक्रांतीच्या दिवशी आपण एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संकल्प करतो अन् आनंदाची देवाणघेवाण करतो. मात्र ‘नायलॉन’ मांजामुळे अनेक कुटुंबीयांना हा दिवस कटू अन् काळ्या आठवणी देऊन गेला आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानंतरदेखील ‘नायलॉन’ मांजाची नागपूरच्या बाजारात विक्री सुरू असणे ही गंभीर बाब आहे. ‘लोकमत’ने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

ठळक मुद्देपर्यावरणप्रेमींची मागणी‘नायलॉन’ मांजा विकणाऱ्यांवरदेखील कठोर कारवाई हवी ‘से नो टू नायलॉन मांजा’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मकरसंक्रांतीच्या दिवशी आपण एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संकल्प करतो अन् आनंदाची देवाणघेवाण करतो. मात्र ‘नायलॉन’ मांजामुळे अनेक कुटुंबीयांना हा दिवस कटू अन् काळ्या आठवणी देऊन गेला आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानंतरदेखील ‘नायलॉन’ मांजाची नागपूरच्या बाजारात विक्री सुरू असणे ही गंभीर बाब आहे. ‘लोकमत’ने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ‘नायलॉन’ मांजाचा उपयोग करून इतरांच्या जीवाला धोका उत्पन्न करणाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हाच दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. शिवाय विक्रेत्यांवरदेखील कठोर कारवाई आवश्यक असल्याचा सूर उमटत आहे.शहरातील विविध बाजारांमध्ये ‘नायलॉन’ मांजाची छुप्या पद्धतीने विक्री सुरू असल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली. शहरात मोठ्या प्रमाणावर हे मांजे खरेदीदेखील करण्यात येत असून यात शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचादेखील समावेश आहे. राष्ट्रीय हरित लवादाने स्पष्ट शब्दांत निर्देश दिल्यानंतरदेखील या जीवघेण्या मांजाचा उपयोग सुरू असणे हे प्रशासनाचे अपयशच मानण्यात येत आहे. ‘नायलॉन’ मांजाने पतंग उडवून तसेच या मांजाची विक्री करून नागरिकांच्या जीवाला धोका उत्पन्न करणाºया पतंगबाजांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केल्यानंतरच त्यांच्यावर वचक येईल. त्याकरिता प्रशासनाने नागरिकांच्या हितासाठी कारवाई करण्याची हिंमत दाखविण्याची वेळ आली आहे अशी मागणी जनतेद्वारे करण्यात येत आहे.मागील काही वर्षांत अनेकांना ‘नायलॉन’ मांजामुळे जीव गमवावा लागला. स्वत:च्या बेजबाबदारपणामुळे दुसऱ्यांना मरणाच्या दारात ढकलणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाच दाखल करायला हवा अशी मागणी, माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी केली. ‘नायलॉन’ मांजाचा उपयोग करणाऱ्या शाळकरी मुलांच्या पालकांवर गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी मागणीदेखील होत आहे.बंदीनंतरदेखील ‘नायलॉन’ मांजा उपलब्ध असणे ही दुर्दैवी बाब आहे. पतंगबाजीत वर्चस्व दाखविण्यासाठी या मांजाचा उपयोग करण्याकडे कल असतो. मात्र असे करत असताना लोकांचा जीव आपण धोक्यात टाकत आहोत, याची जराशी जाणीवदेखील यांना नसते. इतरांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार यांना दिला तरी कुणी, असा संतप्त सवाल ‘ग्रीन व्हिजील’च्या ‘टीम लीडर’ सुरभी जयस्वाल यांनी केला.मनपाच्या अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम‘नायलॉन’ मांजावर देशभरात बंदी असताना नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये मात्र मांजा विक्रेत्यांवर कारवाईसंदर्भात संभ्रमाचे वातावरण आहे. यासंदर्भात हरीत लवादाकडून कारवाईसंदर्भात नेमके व स्पष्ट निर्देश प्राप्त झालेले नाहीत, अशी भूमिका काही अधिकाऱ्यांनी मांडली. कारवाईसंदर्भात स्पष्ट निर्देश नसले तरीदेखील आम्ही पोलीस विभागाच्या सहकार्याने हनुमाननगर, धरमपेठ, गांधीबाग, लकडगंज, सजरंजीपुरा झोनमध्ये तपासणी करत आहोत, असे मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात मनपाचे आयुक्त अश्विन मुद्गल यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.पोलीस काय करीत आहेत?पतंगबाजांवर नियंत्रण आणण्याची जबाबदारी पोलिसांवरदेखील आहे. ‘बॉम्बे पोलीस अ‍ॅक्ट’मध्ये पतंगांबाबत कलम ११३, ११७ अंतर्गत तरतुदी स्पष्ट केल्या आहेत. जर पतंग उडविण्यामुळे कोणाला शारीरिक इजा किंवा नुकसान होणार असेल तर कलम ११३ नुसार तो गुन्हा ठरतो व त्या व्यक्तीला कलम ११७ नुसार बाराशे रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. त्याशिवाय यात स्पष्ट करण्यात आले आहे की जर अशाप्रकारे कोणी पतंग उडविताना दिसला तर पोलिसांनी त्या व्यक्तीला तिथेच थांबविले पाहिजे. जर यामुळे कोणी मरण पावला तर भा.दं.वि.च्या कलम ३०४ नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा होतो. परंतु पोलीस यंत्रणा जबाबदारी पार पाडत नसल्याचे दिसून येते.लोकप्रतिनिधींचा पुढाकार नाहीनायलॉन मांजाच्या धोका हा केवळ एका शहरापुरताच मर्यादित नसून राज्यातील अनेक शहरांतील नागरिकांच्या जीवावर यामुळे बेतू शकते. लोकप्रतिनिधी व प्रशासनासोबतच सरकारने स्वत:हून यासंदर्भात ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. परंतु दुर्दैवाने असे होताना दिसून येत नाही. लोकप्रतिनिधी हे चारचाकीशिवाय प्रवासच करीत नसल्याने त्यांना या धोक्याची कल्पनादेखील येत नाही. एरवी लहानसहान प्रकरणांत मोठी आंदोलने करणाऱ्या नेत्यांना रस्त्यांवरील हा मृत्यूचा धोका दिसत नाही का असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.दुचाकीस्वारांनी घ्यावी काळजीघरांचे छत व मैदानांवरचा ‘ओ काट’ चा खेळ आता चक्क रस्त्यांवरच रंगू लागल्याने कोणत्याही क्षणी रस्त्यावर आडवा येणाऱ्या मांज्याच्या रूपाने कोणत्याही क्षणी काळाची झडप वाहनचालकांवर बसू शकते. विशेषत: महाल, इतवारी, मानेवाडा, सक्करदरा, गोपालनगर, चुनाभट्टी, जरीपटका, रेशीमबाग, सक्करदरा या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘नायलॉन’ तसेच काच लावलेल्या मांजाचा उपयोग सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी गळ्या भोवती रुमाल, स्कार्फ किंवा मफलर गुंडाळून दुचाकी चालविणे क्रमप्राप्त ठरणार आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर