शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आकाशातून काेसळलेले ‘ते’ तुकडे चिनी उपग्रहाचे, इस्राेचा खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2023 08:20 IST

चंद्रपूर, वर्धा, गडचिरोलीतील घटनांचा शासनाला अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात तसेच वर्धा जिल्ह्यातील काही भागांत गेल्या वर्षी आकाशातून पडलेले तप्त धातूचे साहित्य हे चिनी उपग्रहाचे तुकडे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भारतीय अंतराळ संशाेधन संस्था (इस्राे) आणि अमेरिकेच्या चंद्रा ऑब्झर्व्हेटिव्ह संस्थेने वर्षभरानंतर याबाबत खुलासा केला. इस्राेने याबाबतचा अहवाल राज्य शासनाला साेपविला.

गेल्या वर्षी २ एप्रिलला रात्री विविध भागांत आकाशातून धातूचे साहित्य पडल्याची घटना घडली. चंद्रपूरमधील सिंदेवाही तालुक्यात लाडबाेरी येथे धातूची माेठी रिंग आणि फुटबॉलच्या आकाराचे सिलिंडर अतिशय उष्ण अवस्थेत आकाशातून कोसळले होते. यासह वर्धा तसेच यवतमाळ जिल्ह्यातही असे धातूचे भाग काेसळल्याची घटना घडली होती. 

तज्ज्ञांकडून निरीक्षण - १५ एप्रिल २०२२ रोजी इस्त्रोचे वैज्ञानिक एम. शहाजहान, मयूरेश शेट्टी यांनी लाडबोरी गावाला भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली. - सिंदेवाही ठाण्यातील त्या अवकाशी वस्तूंची पाहणी करून त्या निरीक्षणासाठी पाठविल्या होत्या.

काय आहे निष्कर्ष ? 

-इस्रोने अवकाशीय वस्तूंचे निरीक्षण केले असता चीनच्या लाँगमार्च सॅटेलाइचे ते तुकडे असल्याचे निष्पन्न झाले. - चीनने हा उपग्रह अवकाशात सोडला होता. त्याचे तुकडे बंगालच्या खाडीत पडणे अपेक्षित होते. - उपग्रहाचे तुकडे महाराष्ट्रातील चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यात कोसळले. - इस्राेने हा अहवाल राज्य व केंद्र सरकारकडे साेपविला आहे. 

टॅग्स :nagpurनागपूरchinaचीनisroइस्रो