शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
4
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
5
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
6
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
7
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
8
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
9
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
10
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
11
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
12
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
13
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
14
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
15
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
16
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
17
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
18
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
19
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
20
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय

पोलीस ठाण्यात तृतीयपंथीयांचा गोंधळ

By admin | Updated: February 26, 2016 03:13 IST

आपली कागदपत्रे परत मिळावी म्हणून तृतीयपंथीयांनी चक्क पोलीस ठाण्यात विवस्त्रावस्थेत गोंधळ घातला.

अश्लील वर्तन : हतबल पोलिसांनी घातली समजूतनागपूर : आपली कागदपत्रे परत मिळावी म्हणून तृतीयपंथीयांनी चक्क पोलीस ठाण्यात विवस्त्रावस्थेत गोंधळ घातला. अत्यंत बीभत्स असा हा प्रकार व्हॉटस्अपवरून व्हायरल झाल्याने समाजमन अस्वस्थ झाले आहे.१९ फेब्रुवारी २०१६ च्या दुपारी १.३० ते २ या वेळेतील हा संतापजनक प्रकार आहे. नंदनवन पोलीस ठाण्यात दैनंदिन कामकाज सुरू असताना अचानक १५ ते २० तृतीयपंथी पोलीस ठाण्यात शिरले. ‘उत्तमबाबा’ याने आमचे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि अशीच महत्त्वपूर्ण कागदपत्रे घेतली. ती तो परत करीत नाही. त्यामुळे आमची कागदपत्रे परत मिळवून द्या, अशी तृतीयपंथीय मागणी करू लागले. ‘प्रकरण पाचपावलीतील आहे, त्यामुळे आम्ही यात काही करू शकत नाही’, असे तेथील एका नवीन पोलीस उपनिरीक्षकाने त्यांना सांगितले. ‘तुम्ही पाचपावलीच्या ठाण्यात जा, तुम्हाला तेथे पाहिजे ती मदत मिळेल’, असेही उपनिरीक्षकाने सांगितले. मात्र, तृतीयपंथीय ऐकायला तयार नव्हते. त्यांनी पोलिसांना शिव्याशाप देणे सुरू केले. अचानक एकापाठोपाठ पाच ते सात तृतीयपंथीयांनी अंगावरचे कपडे फेकून विवस्त्रावस्थेत ठाण्यात गोंधळ घालून पोलिसांना शिवीगाळ सुरू केली. या घाणेरड्या प्रकारामुळे पोलीस हादरले. ठाण्यातील कामाच्या निमित्ताने उपस्थित तर अचंबितच झाले. त्यांना कसे आवरावे, असा प्रश्न पडल्याने काही जण चक्क पोलीस कर्मचारी ठाण्याच्या बाहेर पळाले. तृतीयपंथीयांना त्यामुळे जास्तच चेव चढला. त्यांनी ठाण्याच्या आवारात आक्षेपार्ह्य वर्तन करीत अक्षरश: हैदोस घातला. शेवटी सयाम नामक पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना कसेबसे आवरत पाचपावली ठाण्यात नेले. तेथे नंतर तृतीयपंथीयांचा प्रमुख उत्तमबाबा याला बोलावून कागदपत्रांविषयी विचारणा करण्यात आली. (प्रतिनिधी)सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया तृतीयपंथीयांच्या या संतापजनक वर्तनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. शिव्या, शाप नको म्हणून समाज तृतीयपंथीयांच्या वर्तनाकडे दुर्लक्ष करतात. ते मागतील तेवढे पैसे देऊन त्यांना परत पाठवितात. मात्र, त्याचा काही तृतीयपंथी गैरफायदा घेतात. ते अनेक ठिकाणी गुन्हेगारांसारखे वागतात. मनासारखे पैसे मिळावे म्हणून लग्नसमारंभ, अथवा दुसऱ्या कोणत्या समारंभात गोंधळ घालतात, अश्लील वर्तन करतात. विशेष म्हणजे, नंदनवन ठाण्यात त्यांनी असाच गोंधळ घालून पोलिसांनी त्यांच्यावर कसलीही कारवाई केली नसल्यामुळे सर्वसामान्यांच्या संतापात आणखीनच भर पडली आहे. यामुळे ही मंडळी जास्त निर्ढावेल, अशी प्रतिक्रियाही अनेक जण व्यक्त करीत आहेत.