शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

स्लम भागातील ३० टक्के नागरिकांचे लसीकरण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 23:45 IST

slum dwellers are not vaccinated लसीचा मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. नागपूर शहरात ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या सुमारे सहा ते साडेसहा लाख आहे. यातील ५ लाख ३ हजार ७४ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. अजूनही एक ते दीड लाख नागरिकांनी डोस घेतलेला नाही. यात प्रामुख्याने स्लम भागातील ३० टक्के नागरिकांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देडोस न घेतलेल्यांचा शोध : सामाजिक संस्थांची मदत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लसीचा मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद आहे.  ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. नागपूर शहरात ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या सुमारे सहा ते साडेसहा लाख आहे. यातील ५ लाख ३ हजार ७४ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. अजूनही एक ते दीड लाख नागरिकांनी डोस घेतलेला नाही. यात प्रामुख्याने स्लम भागातील ३० टक्के नागरिकांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.

४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी महापालिकेने लसीकरण आपल्या दारी मोहीम हाती घेतली आहे, सोबतच विविध उपक्रम राबविले जात आहेत. जनजागृती केली जात आहे. सेवाभावी संस्थांची मदत घेतली जात आहे. यात रोटरी ईशान्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, मनपा कर्मचारी, भोपाळ इंजिनिअरिंगच्या माजी विद्यार्थ्यांचा ग्रुप, समूह संघटक, महिला बचत गट व झोनस्तरावरील कर्मचारी आदींचा समावेश असल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

राज्य शासनाने १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना लस देण्याचे जाहीर केल्यानंतर, शहरात केवळ ११ हजार १४१ नागरिकांना लस देण्यात आली. मात्र त्यानंतर लसीचा निर्माण झालेला तुटवडा बघता, या वयोगटाचे लसीकरण बंद करण्यात आले. आता केवळ ४५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जात आहे. त्यामुळे आधी दररोज १५ ते १६ हजार लाभार्थ्यांना डोस दिले जात होते. परंतु आता हा आकडा दोन ते अडीच हजारांवर आला आहे. नागपूर शहरात आतापर्यंत ५.३ लाख लाभार्थ्यांना पहिला डोस, तर १ लाख ६४ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

लसीकरणासाठी पुढे यावे-आयुक्त

४५ वर्षांवरील लसीकरण मोहिमेमध्ये पात्र व्यक्तींनी लसीकरणासाठी पुढे येऊन आपले लसीकरण करून घ्यावे. मनपाद्वारे जारी दिशानिर्देशांचे पालन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षेसाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहनसुद्धा मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

नागपुरात लसीकरणाची अद्ययावत स्थिती

पहिला डोस

आरोग्य सेवक - ४५,५४५

फ्रंटलाईन वर्कर -५२,९०५

१८ वयोगट - (सध्या बंद आहे)

४५ वयोगट - १,३४,०९३

४५ कोमार्बिड -८३,४२१

६० सर्व नागरिक - १,७६,४६९

पहिला डोस - एकूण - ५,०३,५७४

दुसरा डोस

आरोग्य सेवक - २३,१९४

फ्रंटलाईन वर्कर - १९,४७१

४५ वयोगट - २९,२८१

४५ कोमार्बिड - १८,२७९

६० सर्व नागरिक - ७३,७७९

दुसरा डोस - एकूण - १,६४,००४

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसnagpurनागपूर