शहरं
Join us  
Trending Stories
1
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
2
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
3
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
4
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
5
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
6
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
7
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
8
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
9
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
10
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
11
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
12
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला नवर्‍याने बायकोला ओवाळणी देणे, हा हक्क की कर्तव्य?
13
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
14
Diwali Car Offers: सर्वात कमी डाऊन पेमेंट भरुन व्हा टाटा पंच ईव्हीचे मालक, 'इतका' असेल ईएमआय!
15
Asrani Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले असरानी? जाणून घ्या शिक्षण आणि नेटवर्थ
16
Diwali Bonus: बोनस कमी दिला म्हणून कर्मचाऱ्यांनी केलं असं काही, काही तासांतच कंपनीचं लाखोंचं नुकसान
17
दिवाळी पाडवा २०२५: १० राशींना गुड न्यूज, समस्या संपतील; भाग्योदय-भरभराट, इच्छापूर्तीचा काळ!
18
Rishabh Pant Captain : पंत टीम इंडियाचा कॅप्टन! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ऋतुराजलाही संधी
19
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप

‘हेल्थ केअर वर्कर्स’ व ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 11:29 IST

Nagpur News आतापर्यंत केवळ ५६ टक्के ‘हेल्थ केअर वर्कर्स’ तर, ३५ टक्के ‘फ्रंटलाईन वर्कर्सनी दोन्ही डोस घेतले आहेत. उपचार करणाऱ्यांचेच संपूर्ण लसीकरण बाकी असताना, तिसरी लाट रोखणार तरी कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देकेवळ ५६ टक्के ‘हेल्थ’, तर ३५ टक्के फ्रंटलाईन वर्कर्सनी घेतला दुसरा डोस

 लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना, ‘हेल्थ केअर वर्कर्स’ व ‘फ्रंटलाईन वर्कर्स’चे १०० टक्के लसीकरण झालेले नाही. दुसऱ्या डोससाठी उदासीनता दिसून येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ५६ टक्के ‘हेल्थ केअर वर्कर्स’ तर, ३५ टक्के ‘फ्रंटलाईन वर्कर्सनी दोन्ही डोस घेतले आहेत. उपचार करणाऱ्यांचेच संपूर्ण लसीकरण बाकी असताना, तिसरी लाट रोखणार तरी कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोरोनावर अद्यापही ठोस उपचार पद्धती नाही. यामुळे गंभीर परिणामांना रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. यामुळे १७ जानेवारीपासून सर्वच ठिकाणी लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात ‘हेल्थ केअर वर्कर्स’, तर दुसऱ्या टप्प्यात ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ना प्राधान्य देण्यात आले. सुरुवातीला या दोन्ही गटात लसीकरणाबाबत भीती होती. परंतु नंतर ती दूर होताच वेग वाढला. जानेवारी ते जुलै यादरम्यान ६५,०५५ हेल्थ केअर वर्कर्सनी पहिला डोस घेतला. परंतु यापैकी केवळ ३६,८२८ वर्कर्सनी दुसरा डोस घेतला. तसेच ११८४१२ फ्रंटलाईन वर्कर्सनी पहिला डोस घेतला असताना, निम्म्याहून कमी, ४१,५७७ वर्कर्सनी दुसरा डोस घेतला आहे. विशेष म्हणजे, ही संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाकडून किंवा संबंधित विभागाकडूनही प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. संभाव्य तिसऱ्या लाटेत या दोन्ही गटात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास कठीण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

- वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्येच जनजागृतीची गरज

हेल्थ केअर वर्कर्स व फ्रंटलाईन वर्कर्समध्ये दुसऱ्या डोसप्रती उदासीनतेचे कारण स्पष्ट झाले नाही. यातील अनेकांना कोरोना होऊन गेल्याने, कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसमध्ये जवळपास ८५ दिवसांच्या कालावधीचे अंतर आल्याने किंवा तपासणीत वाढलेल्या अँटिबॉडीज पाहून किंवा गैरसमजापोटी दुसरा डोस घेण्यात आला नसल्याची शक्यता आहे. यामुळे ज्यांनी लस घेतलीच नाही किंवा दुसऱ्या डोसपासून अद्यापही दूर आहेत, त्यांच्यामध्ये लसीकरणाविषयी जनजागृती करण्याची गरज आहे.

- दोन्ही गटातील लाभार्थ्यांचे सामान्य गटात लसीकरणाची शक्यता

लसीकरणाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात ‘हेल्थ केअर वर्कर्स’ व ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ना प्राधान्य देण्यात आले. त्यावेळी ‘को-विन’ अ‍ॅपवर नोंदणी झालेल्यांची नोंदणी केली जात होती. नंतर १८ वर्षांपासून पुढील वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्यात आले. यामुळे या ‘हेल्थ’ व ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ यांनी सामान्य गटात नोंदणी करून लसीकरण करून घेतले असावे. या दोन्ही गटांना लसीकरणाचे महत्त्व माहीत आहे.

- डॉ. संज़य चिलकर, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभाग

:: हेल्थ केअर वर्कर्स

पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या : ६५०५५

दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या : ३६८२८

:: फ्रंट लाईन वर्कर्स

पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या : ११८४१२

दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या : ४१५७७

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस