शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

चोरांनी केला ‘कुलर डक्ट’चा वापर, 12 तासात चोरांना अटक

By admin | Updated: January 18, 2017 23:06 IST

बिल्डरच्या कार्यालयातील आॅफीस बॉयने साथीदारांच्या मदतीने कार्यालयातील साडे तीन लाख रूपये चोरून नेले. गणेशपेठ पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावित तिघांना अटक केली.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 18 - बिल्डरच्या कार्यालयातील आॅफीस बॉयने साथीदारांच्या मदतीने कार्यालयातील साडे तीन लाख रूपये चोरून नेले. गणेशपेठ पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावित तिघांना अटक केली. आरोपींनी कार्यालयात शिरण्यासाठी ‘कुलर डक्ट’चा (हवा येण्याची जागा) वापर केला होता हे विशेष. शाहनवाज उर्फ सोनू अब्दुल जमील (२३) रा.अरविंदनगर, आकाश पुरुषोत्तम मौंदेकर (२६) रा.संजीवनी क्वॉर्टर आणि शाहरुख खान उर्फ राजा अब्दुल रशीद (२०) रा. गरीबनवाजनगर अशी आरोपीची नावे आहे. भालदारपुरा येथे हसन अली यांचे राज अ‍ॅण्ड राज कंस्ट्रक्शन आहे. त्यांच्या कार्यालयात सोनू आॅफीस बॉय आइण वाहन चालक म्हणून काम करीत होता. १५ जानेवारी रोजी रात्री कार्यालयातील साडे तीन राख रूपये चोरट्यांनी चोरून नेले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा यात ओळखीच्या व्यक्ती सहभागी असल्याचा संशय आला. पोलिसांना सोनूवर संशय आला. त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. तो संशयास्पद युवकांसोबत राहत असल्याचे आढळून आले. या आधारावर त्याची विचारपूस करण्यात आली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, पंरतू पोलिसांनी कठोरपणे विचारपूस केली तेव्हा त्याने आकाश व राजाच्या मदतीने चोरी केल्याचे कबुल केले.सोनुला कार्यालयात मजुरंना वाटप करण्यासाठी असलेली रक्कम ठेवली असल्याची माहिती होती. मकर संक्रांतीमुळे बँक बंद असल्याने कार्यालयात मोठी रक्कम हमखास मिळेल, याची त्याला खात्री होती. १५ जानेवारी रोजी रात्री तिघेही मोमीनपुरा येथे पोहोचले. सोनू मोमीनपुºयातच थांबला. तर आकाश आणि राजा कार्यालयात गेले. ते छतावर ठेवलेल्या कुलर डक्टमधून कार्यालयातील अकाऊंट सेक्शनमध्ये पोहोचले. सोनुने सांगितल्यानुसार ड्राव्हरमधून साडे तीन लाखरूपये चोरले.  पोलिसांनी आकाश व राजलाही अटक केली. त्याच्याकडून चोरलेले रूपये जप्त करण्यात आले. आकाश हा जनावरांच्या तस्करीतही सहभागी आहे. त्याच्याविरुद्ध मारहाण व जनावराच्या तस्करीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींना ते पकडले जाणार नाहीत, याची खात्री होती. परंतु पोलिसांनी १२ तासातच त्यांना शोधून काढले. ही कारवाई डीसीपी संभाजी कदम, एसीपी अरुण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अनिल ताकसांडे, शरद चांभारे, अजय गिरडकर आणि आशीष बहाड यांनी केली.