शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील कॅमेऱ्यात दिसला नागपुरातील चोर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 12:30 IST

नागपुरातील एका मोठ्या खासगी बँकेचे एटीएम फोडण्यासाठी एक भामटा आतमध्ये शिरला. आतमधील रोकड काढण्यासाठी त्याने एटीएम मशीनची तोडफोड सुरू केली. हा सर्व गैरप्रकार बँकेची सर्व्हिलन्स टीम मुंबईतून कॅमेºयात बघत होती. धोका लक्षात घेऊन त्यांनी तेथून तात्काळ स्थानिक पोलीस नियंत्रण कक्षात माहिती दिली.

ठळक मुद्देएटीएमची तोडफोडसतर्कतेमुळे टळली घटना

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील एका मोठ्या खासगी बँकेचे एटीएम फोडण्यासाठी एक भामटा आतमध्ये शिरला. आतमधील रोकड काढण्यासाठी त्याने एटीएम मशीनची तोडफोड सुरू केली. हा सर्व गैरप्रकार बँकेची सर्व्हिलन्स टीम मुंबईतून कॅमेऱ्यात बघत होती. धोका लक्षात घेऊन त्यांनी तेथून तात्काळ स्थानिक पोलीस नियंत्रण कक्षात माहिती दिली. नियंत्रण कक्षाने संबंधित भागातील पोलिसांना कळविले. त्यामुळे पोलिसांचे पथक लगेच एटीएमकडे धावले. पोलिसांची चाहूल लागल्यामुळे की काय आरोपी तेथून सटकला. त्यामुळे बँकेचे एटीएम आणि त्यातील रक्कम वाचली. काहीशी सिनेमातील प्रसंगासारखी वाटणारी ही घटना नागपुरात घडून आता चार दिवस झाले. मात्र बँक प्रशासनाने अद्यापही पोलिसांकडे तक्रार नोंदवलेली नाही. त्यामुळे ही घटना सतर्कता आणि दुर्लक्षिततेचा नमुना ठरली आहे.पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी पहाटे ३ वाजून १५ मिनिटांनी ही घटना घडली. टेकानाका चौकाजवळ अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. एटीएम फोडून त्यातील रक्कम काढण्याचे कलुषित मनसुबे घेऊन एक भामटा रविवारी पहाटे ३ च्या सुमारास एटीएममध्ये शिरला. त्याने एटीएम मशीन फोडण्याचे प्रयत्न सुरू केले. बँकेच्या मुंबई मुख्यालयातील सर्व्हिलन्स टीमला आपले एटीएम फोडले जात असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी लगेच नागपूरच्या पोलीस नियंत्रण कक्षात फोन करून ही माहिती कळविली. नियंत्रण कक्षाने कपिलनगर पोलीस ठाण्यात माहिती दिली. कपिलनगर पोलीस पथक लगेच एटीएमच्या दिशेने धावले. दरम्यान, सतर्क भामटा पोलिसांचे वाहन येत असल्याचे पाहून तेथून पळून गेला. पोलिसांनी नंतर बँकेच्या व्यवस्थापकाला एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती कळविली. बँक प्रशासनाने त्याबाबत फारसे गांभीर्य दाखवण्याची तसदी घेतली नाही. आपले दैनंदिन व्यवहार एटीएममधून जैसे थे सुरू ठेवले. आता या घटनेला चार दिवस झाले आहेत. परंतु अद्यापही बँक व्यवस्थापनाकडून पोलीस ठाण्यात तक्रार आलेली नाही. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेºयात एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारा आरोपी कैद झाला आहे. पोलिसांकडून तक्रार मिळाल्यास गुन्हा दाखल करून पोलिस त्याचा शोध घेऊ शकतात. त्यामुळे त्या गुन्हेगाराकडून पुढे अशा प्रकारच्या किंवा दुसऱ्या कोणत्या घडू शकणाºया गुन्ह्याला आळा बसू शकतो; मात्र बँक व्यवस्थापनाकडून अद्यापही तक्रार न मिळाल्यामुळे पोलिसही हतबल झालेले आहेत. या घटनेतून बँकेच्या मुंबईतील सर्व्हिलन्स टीमची सतर्कता आणि याच बँकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांचा दुर्लक्षितपणा अधोरेखित झाला आहे.तक्रारच नाही, कारवाई कशी होणार!यासंबंधाने कपिलनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार मते त्यांच्याशी संपर्क करून त्यांना घटनेबाबत विचारणा केली असता त्यांनी घटना घडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. कारवाईबाबत बोलताना त्यांनी बँक व्यवस्थापनाकडून अद्यापही आपल्याकडे तक्रार आली नसल्याचेही सांगितले.-----

 

टॅग्स :atmएटीएमCrime Newsगुन्हेगारी