शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

-अन् चोरट्याने तिजोरीच उचलून नेली; नागपुरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 10:30 IST

नागपुरातील माऊंट रोडवर असलेल्या एलबी हॉटेलमध्ये बुधवारी पहाटे घडलेल्या सिनेस्टाईल चोरीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देएलबी हॉटेलमध्ये धाडसी चोरी १० मिनिटात साडेदहा लाख लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हॉटेलच्या उघड्या शटरमधून आत शिरून एका चोरट्याने आतमधील नोटांनी खचाखच भरलेली तिजोरीच चोरून नेली. तिजोरीत १० लाख ४४ हजार रुपये होते. सदरमधील माऊंट रोडवर असलेल्या एलबी हॉटेलमध्ये बुधवारी पहाटे घडलेल्या या सिनेस्टाईल चोरीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.प्रवीण शामराव धार्मिक (वय ३१, रा. जागनाथ बुधवारी) हे सदरमध्ये एलबी हॉटेल-२ मध्ये व्यवस्थापक आहेत. बुधवारी उशिरा रात्रीपर्यंत येथे ग्राहक होते. ते गेल्यानंतर प्रवीण धार्मिकही निघून गेले. पहाटे ४ वाजता शटरचे हॉटेल उघडे असल्याची संधी साधून एक चोरटा आत शिरला. तो आरामशीर हॉटेलमध्ये गेला. त्याने बाहेर आणि आतमध्ये असलेल्या सीसीटीव्हीचे कनेक्शन बंद केले. त्यानंतर आतमध्ये (स्टोअर रूममध्ये) असलेल्या गोदरेजच्या इलेक्ट्रीक तिजोरीला उचलून १० मिनिटात चोरटा बाहेर आला. तेथून अंधाराचा फायदा उठवत पळून गेला. तिजोरीत १० लाख ४४ हजार ४६८ रुपये होते. सकाळी ११ वाजता हॉटेल मालक नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये आले. त्यांना नियोजित जागी तिजोरी दिसली नाही म्हणून त्यांनी कर्मचाऱ्यांना विचारणा केली. कुणीच काही माहिती नसल्याचे सांगितल्याने पोलिसांना बोलविले. त्यानंतर या चोरीच्या घटनेचा बोभाटा झाला.विशेष म्हणजे, ज्यावेळी हॉटेलमध्ये चोरी झाली त्यावेळी हॉटेलचा सिक्युरिटी गार्ड शटरजवळ झोपून होता. आतमधील वेटर, कर्मचारी वरच्या माळ्यावर झोपले होते. त्यामुळे चोरट्याला अवघ्या १० मिनिटात साडेदहा लाख रुपये चोरणे सहज शक्य झाले.

चोरटा नेहमीच्या संपर्कातील!पोलिसांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर तपासला असता त्यात चोरटा आरामशीर येताना आणि अवघ्या १० मिनिटात नोटांनी भरलेली तिजोरी घेऊन जाताना दिसला. त्याची एकूणच देहबोली लक्षात घेता तो या हॉटेलमध्ये नेहमीच येत असल्याचा आणि त्याला हॉटेलच्या आत-बाहेरची सर्वच माहिती असल्याचा अंदाज पोलिसांनी काढला. अर्थात चोरटा हॉटेलच्या संपर्कातीलच कुणी असावा, असा पोलिसांचा कयास आहे. या चोरीचा आम्ही लवकरच छडा लावू, असा विश्वास सदरचे ठाणेदार महेश बनसोडे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी