शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपने घेतली; शिंदेंना धक्का, नाशिकचे ठरवा...; बावनकुळे-भुजबळांचा स्पष्ट संदेश
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
5
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
6
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
7
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
8
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
9
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
10
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
11
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
12
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
13
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
14
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
15
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
16
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
17
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
18
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
19
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
20
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला

त्या आल्या,‘सेल्फी’ काढल्या अन् निघून गेल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 1:07 AM

भाजपाची केंद्रात, राज्यात आणि नागपूर महानगरपालिकेत सत्ता आहे. अशास्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या चिनी वस्तूंच्या विरोधातील आंदोलनात कार्यकर्ते प्रचंड प्रमाणात सहभागी होणे अपेक्षित आहे.

ठळक मुद्देभाजपा महिला कार्यकर्त्यांचे चिनी वस्तूंविरोधात असेही आंदोलन : ‘चमकोगिरी’च अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाची केंद्रात, राज्यात आणि नागपूर महानगरपालिकेत सत्ता आहे. अशास्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या चिनी वस्तूंच्या विरोधातील आंदोलनात कार्यकर्ते प्रचंड प्रमाणात सहभागी होणे अपेक्षित आहे. बुधवारी पक्ष कार्यालयासमोर महिला कार्यकर्त्या आल्या, अगोदर ‘सेल्फी’ काढल्या; नंतर बोटावर मोजण्याइतपत चिनी वस्तू दोन बादल्यांमध्ये बुडविल्या, परत ‘फोटोसेशन’ केले अन् ‘चायनीज मोबाईल’वर ‘से नो टू चायना’ असे लिहित ‘फोटो’ शेअर केले. अशारीतीने ‘सेल्फीमय’ आंदोलनाचे सोपस्कार पार पाडले. प्रसिद्धीच्या नादात बुधवारी महिला कार्यकर्त्यांच्या आंदोलनातील पार हवाच निघून गेली.बुधवारी भाजपा महिला मोर्चातर्फे गणेशपेठ येथील पक्ष कार्यालयासमोर चिनी वस्तूंच्या विरोधात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून ही माहिती पक्ष कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. प्रत्यक्षात आंदोलनस्थळी ५० हून अधिक महिलादेखील जमल्या नाहीत. आश्चर्याची बाब म्हणजे आंदोलनस्थळी नियोजनाची तर बोंबच होती. अवघ्या चार ते पाच चिनी वस्तू होत्या. ‘चिनी वस्तू बुडवा’ असे आंदोलन होते. मात्र अतिउत्साहात कार्यकर्त्यांनी पायदळी वस्तू तुडविल्या. मग नेमके आंदोलन काय, याची आठवण आली.ऐनवेळी जवळील दुकानांमधून दोन बादल्या आणल्या गेल्या आणि अगोदरच तोडलेल्या ‘चिनी’ वस्तूंना १ फूट पाण्यात जलसमाधी देण्यात आली. या आंदोलनाला पाहून शहर भाजपाच्या काही पदाधिकाºयांनी तर कपाळावरच हात मारून घेतला. शहराच्या महापौर डॉ. नंदा जिचकार यांच्या उपस्थितीत हे नियोजनशून्य आंदोलन झाले. या ‘सो कॉल्ड’ आंदोलनाला काही आजी-माजी नगरसेविकादेखील उपस्थित होत्या. कार्यकर्त्यांची ‘सेल्फीगिरी’ पाहून एका माजी महिला महापौरांनी संतापदेखील व्यक्त केला व कार्यकर्त्यांना फटकारले. मात्र त्यांच्या हाती सत्तेची चावी नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांचे बोलणे गंभीरतेने घेतलेच नाही.नियोजनाचा बोजवारासंघाच्या विविध संघटनांतर्फे प्रसिद्धीच्या मागे न धावता नियोजनबद्ध पद्धतीने मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र भाजपा महिला आघाडीच्या या आंदोलनात ना गर्दी दिसली ना नियोजन होते ना उत्साह होता. चिनी वस्तूंच्या विरोधापेक्षा ‘फोटोसेशन’वरच जास्त भर देण्यात आला. या नादात नियोजनाचा पार बोजवारा उडाल्याचे चित्र होते.