शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

थर्मोकोल व प्लास्टिकबंदी अमलात येणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 09:57 IST

राज्यभर थर्मोकोल व प्लास्टिकच्या कॅरिबॅग्जच्या उत्पादन व वापरावर बंदी घालणारा राज्य सरकारचा निर्णय केवळ अमलात आणायला कठीणच नाही तर तो सामान्य नागरिक, किरकोळ दुकानदार ते उद्योपगती अशा सर्वांवर अन्याय करणारा आहे.

ठळक मुद्देप्लास्टिकच्या पर्यायाबद्दल सरकार गप्पबंदी कशावर आहे? राज्य सरकारने २३ मार्च २०१८ ला काढलेल्या या जीआरद्वारे थर्मोकोल/प्लास्टिकच्या एकदाच वापरली जाणाऱ्या वस्तू उत्पादन, खरेदी-विक्री, साठवणुकीवर व वापरावर पूर्णत: बंदी घातली आहे.

सोपान पांढरीपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभर थर्मोकोल व प्लास्टिकच्या कॅरिबॅग्जच्या उत्पादन व वापरावर बंदी घालणारा राज्य सरकारचा निर्णय केवळ अमलात आणायला कठीणच नाही तर तो सामान्य नागरिक, किरकोळ दुकानदार ते उद्योपगती अशा सर्वांवर अन्याय करणारा आहे.बंदी कुणाला लागू आहे?प्लास्टिकबंदी ही सर्व नागरिक, सरकारी व गैरसरकारी संस्था, क्रीडा संकुल, क्लब्ज, चित्रपट व नाट्यगृहे, औद्योगिक घटक, समारंभाचे हॉल, कार्यालये इत्यादींना लागू असेल. या सर्वांना आपल्याजवळच्या प्लास्टिक बॅग्ज नष्ट करण्यासाठी एक महिन्याचा अवधी आहे व त्यानंतर तो दंडनीय अपराध ठरेल. याचबरोबर ५०० मिलीलिटरची बाटली दुकानदारास परत केल्यास दोन रुपये व एक लिटरपेक्षा अधिक क्षमतेची बाटली परत केल्यास एक रुपया परत मिळेल. तशी किंमत बाटलीवर छापलेली असेल.

अमलात आणायला का कठीण?सरकारने थर्मोकोल/प्लास्टिकच्या वस्तूवर बंदी घातली खरी, पण पॅकेजिंगसाठी काय पर्याय वापरावे यावर या १२ पानांच्या जीआरमध्ये कुठलाही पर्याय नाही. याशिवाय थर्मोकोल (पॉली स्टायरीन) व प्लास्टिक (पॉली प्रॉपिलीन)सह सर्व पेट्रोकेमिकल्स ज्या नॅप्थापासून बनतात त्याच्या उत्पादन, खरेदी/विक्री, वापरांवर बंदी घातलेली नाही. नॅप्था हा पेट्रोलियम रिफायनरीतून निघणारा औद्योगिक उपयोगाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यावर बंदी नसल्यामुळे नॅप्थाचे उत्पादन सुरूच राहणार व प्लास्टिक/ थर्मोकोल महाराष्ट्रात बनले नाही तरी इतर राज्यांत तयार होणार व महाराष्ट्रातही पोहोचणार. त्यामुळे प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी करणे अशक्य होणार आहे.

काय व्हायला हवे?महाराष्ट्र सरकारने २००६ साली महाराष्ट्र प्लास्टिक बॅग्ज नियमाद्वारे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक बॅग्ज व शीटस्च्या उत्पादन व वापरावर बंदी आधीच घातली आहे. कारण ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक बॅग्ज वजनाने हलक्या असल्याने भंगारवालेसुद्धा घेत नाहीत. परिणामी त्या हवेत उडत राहतात व कधी सिवरेज, गटारात जमा होऊन बसतात व प्रदूषण वाढवतात. जगभर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक बॅग्ज/शीटस् फक्त भारतातच वापरल्या जातात. त्यावर महाराष्ट्रात पूर्ण बंदी आहेच, पण गरज आहे ती सक्तीने अमलात आणण्याची. हे न करता सरकारने सर्वच प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे त्यामुळेही अंमलबजावणी कठीण आहे. जगभर प्लास्टिक पॅकेजिंगच्या क्षेत्रात औद्योगिक क्रांती आणली असताना त्यावर बंदी घालणे हे औद्योगिक विकासासाठी मारक ठरू शकते व परिणामी प्लास्टिक बंदीचा फज्जा उडू शकतो.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी