शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

तेथे सर्वत्र फक्त शांतताच -----

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 21:58 IST

या रस्त्यांवरून लोक कधीही सर्रासपणे ये-जा करायचे. कधीही अडचण आली नाही. परंतु २२ वर्षाच्या एका युवकाच्या मृत्यूनंतर त्याची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आणि इतरही काही लोक पॉझिटिव्ह सापडल्यापासून पार्वतीनगर, जवाहरनगर आणि रामेश्वरी परिसर सील करण्यात आला आहे. रस्त्यांवर १० ते १५ फूट उंच टिनांनी रस्ता आडविण्यात आला आहे.

ठळक मुद्देलोकमत ग्राऊंड रिपोर्टपार्वतीनगर, जवाहरनगर, रामेश्वरीतील ‘आँखो देखा हाल’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : या रस्त्यांवरून लोक कधीही सर्रासपणे ये-जा करायचे. कधीही अडचण आली नाही. परंतु २२ वर्षाच्या एका युवकाच्या मृत्यूनंतर त्याची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आणि इतरही काही लोक पॉझिटिव्ह सापडल्यापासून पार्वतीनगर, जवाहरनगर आणि रामेश्वरी परिसर सील करण्यात आला आहे. रस्त्यांवर १० ते १५ फूट उंच टिनांनी रस्ता आडविण्यात आला आहे. एक अरुंद एंट्री गेट ठेवण्यात आले आहे. कचरागाडी, भाजी विकणारा आणि, दूध विकणारेही सील करण्यात आलेल्या परिसरात येऊ शकत नाहीत. भीती इतकी आहे की लोकही आपल्या घराबाहेर पडण्यास भीत आहेत. बहुतांश घरांच्या गेटवर तर लोकांनी भीतीमुळे कुलूप लावले आहे. कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांवर कधी लोक सहजपणे फेरफटका मारताना दिसायचे ते रस्ते आता शांत आहेत. परिसरात इतकी स्मशान शांतता आहे की, आपल्या घरांमध्ये असलेले लोकही स्वत:ला असुरक्षित समजत आहेत. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, त्यांच्या घरातील गर्भवती महिला आणि वयोवृद्ध लोकांना उपचारासाठी नियमित रुग्णालयात जाणेही कठीण झाले आहे. कुणाला जायचेच असेल तर इतक्या तांत्रिक अडचणी येतात की व्यक्ती त्रस्त होतो. एकूणच आम्हाला तुरुंगातील कैद्यांसारखे वाटतेय, अशी इथल्या लोकांची प्रतिक्रिया आहे.आणखी किती दिवस?या परिसरातील नागरिक मागील काही दिवसांपासून घरगुती सिलिंडरची आतुरतेने वाट पाहत होते. सिलिंडरच्या गाडीला मोठ्या प्रयत्नानंतर बुधवारी प्रवेश मिळाला. परिसरात इतकी स्मशान शांतता आहे की, बाल्कनीतून लोकांना केवळ सील करण्यासाठी लावलेले टिन दिसून येतात. पुढील १४ दिवस दुसरा रुग्ण आढळून न आल्यास हा परिसर मोकळा करण्यात येईल. परंतु दुसरा रुग्ण आढळलाच तर मात्र आणखी १४ दिवस वाट पाहावी लागेल, याचा विचारानेही लोक अतिशय चिंतेत पडले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर