शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिल महिन्यात ९० खाटांचे होणार ट्रॉमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:10 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) ‘ड्रीम प्रोजेक्ट’ ट्रॉमा केअर सेंटर एप्रिल महिन्यापासून पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे. या सेंटरमध्ये आणखी ३० खाटांची भर पडून त्याची संख्या ९० होणार आहे. परिणामी, अपघातातील गंभीर रुग्णांना हे सेंटर वरदान ठरणार आहे.

ठळक मुद्देमेडिकल : २० व्हेंटिलेटरची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) ‘ड्रीम प्रोजेक्ट’ ट्रॉमा केअर सेंटर एप्रिल महिन्यापासून पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे. या सेंटरमध्ये आणखी ३० खाटांची भर पडून त्याची संख्या ९० होणार आहे. परिणामी, अपघातातील गंभीर रुग्णांना हे सेंटर वरदान ठरणार आहे.रस्ता अपघाताच्या वाढत्या संख्येला लक्षात घेऊन प्रत्येक जिल्हाच्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरची घोषणा नुकतीच आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केली. यामुळे ‘ट्रॉमा’चे महत्त्व शासन दरबारी वाढले आहे. मात्र मेडिकलच्या ‘ट्रॉमा’ला अनेक अडचणीतून मार्ग काढावे लागले आहे. तब्बल चार वर्षानंतर बांधकामाला सुरूवात झाली. ३० खाटांपासून सुरू झालेले हे सेंटर आता दोन वर्षाचा कालावधी होत असताना अंतिम टप्प्यात पोहचले आहे. तूर्तास तरी ७० खाटा, एक शस्त्रक्रिया गृह, तीन अतिदक्षता विभाग व एका वॉर्डातून ‘ट्रॉमा’चा कारभार सुरू आहे. एप्रिल महिन्यात यात आणखी ३० खाटाने वाढ झाल्यास व २० व्हेंटीलेटरची भर पडल्यास हे सेंटर पूर्णत्वास येणार आहे. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी याला दुजोरा दिला आहे.ट्रॉमा केअर सेंटरच्या एकाच छताखाली ‘इन्टरव्हेन्शनल रेडिओलॉजी’, सिटी स्कॅन, एक्स-रे, सोनोग्राफी उपकरण उपलब्ध करून देण्यात आल्याने अपघाताच्या रुग्णाला तातडीने उपचार मिळत आहे. तळमजल्यावर ‘कॅज्युल्टी’, रेडिओलॉजी व शस्त्रक्रिया गृह आहे. पहिल्या मजल्यावर दोन शस्त्रक्रिया गृह, एक सर्जिकल अतिदक्षता विभाग व ड्रग स्टोअर, तर दुसऱ्या  मजल्यावर दोन अतिदक्षता विभाग व एक वॉर्ड आहे.‘ट्रॉमा’त अद्ययावत वैद्यकीय सुविधामेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये रुग्णांसाठी अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, दोन शस्त्रक्रिया गृहाला ‘सेमी मॉड्यूलर’चे स्वरुप दिले जात आहे. हे काम पूर्णत्वास आल्यास व जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून २० व्हेंटिलेटर मिळाल्यास ९० खाटांमधून पूर्ण क्षमतेने ट्रॉमा केअर सेंटरला सुरूवात होईल.डॉ. अभिमन्यू निसवाडेअधिष्ठाता, मेडिकल

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयnagpurनागपूर