शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

लेंड्रापार्क रामदासपेठेत ‘तो’ दरोडा पडलाच नाही

By admin | Updated: October 23, 2016 02:43 IST

लेंड्रापार्क न्यू रामदासपेठ येथे तीन वर्षांपूर्वी दरोड्याची घटनाच घडलेली नाही. भारती बेलसरे यांची विजय तालेवार आणि साथीदारांविरुद्धची तक्रार खोटी आहे,

बेलसरे यांची तालेवारविरुद्धची तक्रार खोटी : न्यायालयात ‘ब’ फायनल अहवाल दाखलनागपूर : लेंड्रापार्क न्यू रामदासपेठ येथे तीन वर्षांपूर्वी दरोड्याची घटनाच घडलेली नाही. भारती बेलसरे यांची विजय तालेवार आणि साथीदारांविरुद्धची तक्रार खोटी आहे, असा निष्कर्ष काढून या प्रकरणाचे तपास अधिकारी सीताबर्डी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डी. बी. काटकर यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी फुलझेले यांच्या न्यायालयात ‘ब’ फायनल अहवाल दाखल केला आहे. भारती दिलीप बेलसरे यांच्या तक्रारीनुसार २४ मार्च २०१२ रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास विजय शंकर तालेवार हे आपल्या साथीदारांच्या मदतीने बेलसरे यांच्या घरात घुसले होते. मारहाण करीत त्यांनी बेलसरे आणि त्यांचे घरमालक रामनारायण मिश्रा यांचे सोन्याचे दागिने लुटून नेले होते. सीताबर्डी पोलिसांनी भादंविच्या २९४, ३२३, ३५४, ३९५, ४४८, ४५२ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. त्याचवेळी तालेवार यांनीही हल्ल्याची तक्रार केल्यावरून भारती बेलसरे, त्यांचा मुलगा, तसेच रामनारायण मिश्रा, आणखी दोन मुले, अन्य सात-आठ जणांविरुद्ध भादंविच्या १४३, १४७,१४८, १४९, २९४, ५०६ (ब), ३२६ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी भारती बेलसरे आणि त्यांच्या मुलाला तात्काळ अटक केली होती. २५ मार्च २०१२ रोजी न्यायालयात जामीन होऊन त्या घरी गेल्या असता त्यांना तालेवार यांनी घराचा ताबा घेऊन घरातील टीव्ही, फ्रीज आदी वस्तू बेपत्ता दिसल्या होत्या.त्यांनी दरोड्याची तक्रार सीताबर्डी पोलीस ठाण्यात नोंदवली होती. गुन्हा दाखल न झाल्याने त्यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशावरून पुन्हा भादंविच्या ३९५, ४४८, १२० (ब), ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. बेलसरे यांनी उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल करून सीताबर्डी पोलिसांच्या तपासावर आक्षेप घेतला होता. ९ जुलै २०१३ दोन्ही गुन्ह्यांचा तपास राज्य सीआयडीकडे सोपविण्यात आला होता. (प्रतिनिधी)