शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

आली माझ्या घरी ही दिवाळी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 23:30 IST

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीला मंगळवारी वंजारीनगर येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गीत, संगीत व नृत्याने सजलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन वंजारीनगर क्रिकेट क्लब यांनी केले तर कलासंगम प्रतिष्ठानतर्फे सादरीकरण करण्यात आले.

ठळक मुद्देनागपुरातील  वंजारीनगरात गीतसंगीताने सजली दिवाळी पहाट 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीला मंगळवारी वंजारीनगर येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गीत, संगीत व नृत्याने सजलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन वंजारीनगर क्रिकेट क्लब यांनी केले तर कलासंगम प्रतिष्ठानतर्फे सादरीकरण करण्यात आले.‘तु बुद्धी दे तु शक्ती दे...’ या भक्तिगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर ‘आली माझ्या घरी ही दिवाळी..., या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे..., कजरा मोहब्बत वाला...’ अशी काही सुरेल गाणी कलावंतांनी सादर केली. चिमुकल्या अवनी रानडे हिने ‘एका तळ्यात होती बदके...’ हे भावगीत समरसतेने सादर केले. ईशा रानडेने ‘हवा हवाई...’ हे गीत सादर करून अभिनेत्री श्रीदेवीला श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी किशोर गलांडे यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांचे वाचन करून त्यांना आदरांजली अर्पण केली. यासोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भजनही त्यांनी सादर केले. अवनीसह राधिका वानखेडे यांनी ‘घुमर’ या गीतावर बहारदार नृत्य सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. यावेळी योगेंद्र रानडे, राखी शिपोरकर, सोनल मास्टे आणि चमूने विविध लोकप्रिय गाणी सादर केली. निवेदन किशोर गलांडे यांचे होते.यावेळी कॅप्टन दीपक लिमसे, डॉ. रवी कोल्हे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी कॅप्टन लिमसे यांनी वºहाडी कविता सादर केली.

टॅग्स :Diwaliदिवाळीmusicसंगीत