शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

जगात अद्यापही आर्थिक स्वातंत्र्य नाही : मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 22:37 IST

१९२० साली नागपुरात पार पडलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात डॉ. हेडगेवार आणि अधिवेशन नियामक मंडळाने ‘पुंजीमुक्त विश्व’ अशी संकल्पना मांडली होती तर, डॉ. आंबेडकरांनी संविधानात आर्थिक स्वातंत्र्याचा सिद्धांत मांडला . दोन्ही संकल्पना एकच असून, तो विचार लघु उद्यमातून अखेरच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, असे कार्य लघु उद्योग भारतीने करावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देलघु उद्योग भारतीच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १९२० साली नागपुरात पार पडलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात डॉ. हेडगेवार आणि अधिवेशन नियामक मंडळाने ‘पुंजीमुक्त विश्व’ अशी संकल्पना मांडली होती तर, डॉ. आंबेडकरांनी संविधानात आर्थिक स्वातंत्र्याचा सिद्धांत मांडला . दोन्ही संकल्पना एकच असून, तो विचार लघु उद्यमातून अखेरच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, असे कार्य लघु उद्योग भारतीने करावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे केले.लघु उद्योग भारतीच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या पर्वाववर नागपुरात रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. मोहन भागवत आपले विचार व्यक्त करत होते. व्यासपीठावर लघु उद्योग भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्र गुप्त, विदर्भ प्रदेश अध्यक्ष रवी वैद्य उपस्थित होते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या पाच वर्षे आधी नागपुरात पार पडलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाची संपूर्ण जबाबदारी डॉ. हेडगेवार यांनी पार पाडली होती. त्या अधिवेशनात हेडगेवार आणि अधिवेशन नियामक मंडळाने, भारताला संपूर्ण स्वातंत्र्य घोषित करा, अशी गर्जना केली होती. संपूर्ण स्वातंत्र्यानंतर भारतच जगाला ‘पुंजी चंगुल से मुक्ती’ अर्थात भांडवलमुक्त अर्थव्यवस्था देऊ शकतो, असा विश्वास दिला होता. त्यानंतर, संविधानाच्या रूपाने डॉ. आंबेडकरांनी आर्थिक स्वातंत्र्याचा विचार दिला. लघु-सूक्ष्म-मध्यम उद्योगातून हा आर्थिक स्वातंत्र्याचा किंवा भांडवलमुक्त अर्थव्यवस्थेचा मार्ग प्रशस्त होतो, असे भागवत यांनी यावेळी स्पष्ट केले. लघु उद्योग जेवढे वाढतील, तेवढ्याच प्रमाणात आर्थिक स्वातंत्र्यात वाढ होईल. त्यासाठी समग्र आणि लघुउद्योग केंद्रित विचार करावा लागेल. त्याकरिता लघु-सुक्ष्म-मध्यम उद्योगाच्या कारागिरीवर भर देणे अनिवार्य ठरेल आणि म्हणून कृषी, उद्योग व व्यापार यांचा समन्वय साधून एक योजना सादर करावी लागेल. या तिघांचा एकत्र विचार झाला तरच संपत्तीत वाढ होईल. याच विचारावर देशाला न्यावे लागेल. याच दृष्टिकोनातून लघुक्षेत्र संघटित होईल आणि तशा वातावरणाची निर्मिती होऊन उद्दिष्टपूर्ती साधली जाईल, असा विश्वास भागवत यांनी व्यक्त केला. हा विचार अखेरच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन भागवत यांनी केले. संचालन लघु उद्योग भारतीचे महासचिव गोविंद लेले यांनी केले. तर आभार रवी वैद्य यांनी मानले.जेवढे विकेंद्रीकरण तेवढेच पर्यावरणाचे संवर्धनउद्योग जेवढे विकेंद्रित असेल तेवढेच शोषण कमी असेल आणि त्याअनुषंगाने पर्यावरणाचा ऱ्हासही कमी होईल. एकंदर लघु-सुक्ष्म-मध्यम उद्योग पर्यावरणावर आधारित असल्याने, त्याचा विचार या उद्योगात केला जातो, असे डॉ. मोहन भागवत यावेळी म्हणाले. याप्रसंगी लघु उद्योग भारतीच्या लघुचित्रफितीचे विमोचन करण्यात आले.

 

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत