शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

विद्यार्थ्यांमध्ये समर्पणाची भावना असावी

By admin | Updated: January 25, 2015 00:51 IST

विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन, ज्ञान, पे्रमासह समर्पण आणि त्यागाची भावना असावी, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी येथे केले.

संबित पात्रा यांचे प्रतिपादन : राष्ट्रीय छात्र संसदेचा समारोपनागपूर : विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन, ज्ञान, पे्रमासह समर्पण आणि त्यागाची भावना असावी, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी येथे केले. रायसोनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशनच्यावतीने सीआरपीएफ गेटसमोरील जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी कॉलेजच्या सभागृहात आयोजित दोन दिवसीय दुसऱ्या ‘राष्ट्रीय छात्र संसदे’च्या समारोपीय दिनाच्या पहिल्या सत्रात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. ‘क्वालिटी बेस एज्युकेशन टू बिल्ट द नेशन’ हा चर्चासत्राचा विषय होता. मंचावर जी.एच. रायसोनी समूहाचे चेअरमन सुनील रायसोनी, मोटिव्हेशनल ट्रेनर उषी मोहनदास, विजय सिन्हा आणि प्रदीप चोपडा होते. संबित पात्रा यांनी सांगितले की, जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी भगवान कृष्णासारखे तेजस्वी व मनस्वी व्हावे. सतत प्रयत्नशील राहण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. प्रदीप चोपडा म्हणाले की, नवनवीन साईटचा शिक्षणावर सकारात्मक परिणाम झाला आहे. रिसर्च पेपर आणि विविध कोर्सची माहिती तात्काळ मिळते, शिवाय घरबसल्या विभिन्न भाषाही शिकता येतात. पुस्तक आणि टॅब दोन्ही उपयुक्त असले तरीही पुस्तकाची जागा कुणीही घेऊ शकत नाही. उषी मोहनदास यांनी कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम असण्यावर भर दिला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात विविध विषय शिकविले जावेत. विजय सिन्हा यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. मीडियाची भूमिका महत्त्वपूर्णतिसऱ्या सत्रात ‘मीडिया ए गेम चेंजर’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे, फिल्ममेकर अशोक पंडित, अशोक लुल्ला आणि परशुराम या वक्त्यांनी बाजू मांडली. अशोक पंडित हे काश्मीरचे विस्थापित असून त्यांचा या विषयाचा गाढा अभ्यास आहे. प्रकाश दुबे यांनी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांची बाजू मांडली. प्रिंट मीडियाने नैतिकता टिकवून ठेवावी. परशुराम यांनी इराक देशात बराच काळ वास्तव्य केले आहे. मीडियाच्या भूमिकेचा फटका इराकला बसला आहे. अशोक लुल्ला यांनी सोशल मीडियाचा गेम चेंजर म्हणून उपयोग केला जाऊ शकतो, असे सांगितले. ज्येष्ठ पत्रकार मनीष अवस्थी यांनी दोन दिवसात विविध विषयावर नामांकित वक्त्यांनी मांडलेल्या मतांवर भाष्य केले. तिसऱ्या ‘राष्ट्रीय छात्र संसदे’चे आयोजन पुढील वर्षी २२ आणि २३ जानेवारीला होणार आहे. संचालन श्वेता शेलगावकर यांनी तर डॉ. प्रा. अमिना वाली यांनी आभार मानले. तिन्ही सत्रात जी.एच. रायसोनी समूहाचे चेअरमन सुनील रायसोनी, कार्यकारी संचालक डॉ. ओ.एस. बिहारे, समूह संचालक (एमबीए विभाग) डॉ. रवींद्र अहेर, जी.एच. रायसोनी लॉ स्कूलचे प्राचार्य डॉ. जयंत एल. अपराजित व विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)