शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

खरंच बँकेत पैसे असतात का सुरक्षित?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 11:24 IST

वाढत्या फसवणुकीच्या घटनांमुळे सरकार राष्ट्रीयकृत बँकेत पैसे ठेवण्याचे आवाहन करते. पण राष्ट्रीयकृत बॅँकेतही फसवणुकीच्या घटना घडत आहे. दर्शन कॉलनी येथील रहिवासी वानखेडे दाम्पत्यांच्या खात्यातून १ लाख ३१ हजार रुपयांचा परस्पर व्यवहार झाला आहे.

ठळक मुद्देवानखेडे दाम्पत्याच्या खात्यातून काढली लाखावर रक्कममहिनाभरानंतरही आरोपी फरारच, पैसेही गेले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाढत्या फसवणुकीच्या घटनांमुळे सरकार राष्ट्रीयकृत बँकेत पैसे ठेवण्याचे आवाहन करते. पण राष्ट्रीयकृत बॅँकेतही फसवणुकीच्या घटना घडत आहे. दर्शन कॉलनी येथील रहिवासी वानखेडे दाम्पत्यांच्या खात्यातून १ लाख ३१ हजार रुपयांचा परस्पर व्यवहार झाला आहे. खात्यातून गेलेले पैसे परत मिळण्यासाठी दोघेही पतीपत्नी पोलीस स्टेशन, सायबर सेल, बँकेत चकरा मारत आहे. तक्रार देऊन महिना लोटल्यानंतरही त्यांचे समाधान झाले नाही.छाया आणि प्रदीप वानखेडे यांचे वर्धमाननगरच्या एसबीआयच्या शाखेत खाते आहे. त्यांच्या खात्यातून ३० डिसेंबर २०१८ रोजी १ लाख २१ हजार व ३१ डिसेंबर २०१८ रोजी ११ हजार रुपये एटीएम व आॅनलाईन ट्रान्सफर करण्यात आले. वानखेडे हे महत्त्वाच्या कामासाठी या पैशाचा वापर करतात. त्यामुळे त्यांनी लक्ष दिले नाही. पण ३ मे २०१९ रोजी त्यांच्या खात्यात १ लाख २० हजार रुपये जमा झाले आणि त्याच दिवशी एटीएम व आॅनलाईन ट्रान्सफरद्वारे काढूनही घेतले. ही बाब बॅँकेच्या लक्षात आल्यानंतर बॅँक मॅनेजर यांनी ६ मे रोजी वानखेडे यांच्याशी संपर्क साधला आणि विचारणा केली. तेव्हा ही धक्कादायक बाब त्यांना महिती पडली. त्यांनी लगेच लकडगंज पोलीस स्टेशन व सायबर सेलकडे तक्रार केली. ८ मे रोजी बँकेने त्यांच्याकडून डिस्प्युट फॉर्म भरून घेतला. पैसे परत मिळेल असा विश्वास बँकेने दिला. पण त्यासाठी लकडगंज पोलीस स्टेशनमधून एफआयआरची कॉपी आणायला सांगितली. पण लकडगंज पोलिसांनी चौकशी केल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात येईल, असे सांगितले. लकडगंज पोलिसांनी केलेल्या चौकशीत घटना गणेशपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्याचे वानखेडे यांना सांगितले. त्यामुळे वानखेडे यांनी गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये भेट दिली. पण येथे बँकेचे प्रकरण हाताळणारे कर्मचारी दीर्घ रजेवर गेल्याचे सांगितले. त्यामुळे आज महिनाभरापासून दोघेही पतीपत्नी एफआयआरची प्रत घेण्यासाठी पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहे.

लगेच चौकशी केली असती तर आरोपी सापडला असता३ मे रोजी त्यांच्या खात्यात १ लाख २० हजार रुपये आले आणि काढूनही घेतले. काढताना सीए रोडवरील एटीएमचा वापर करण्यात आला. वानखेडे दाम्पत्यांनी ६ मे रोजी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी लगेच तपास केला असता, एटीएमवरील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असते, तर आरोपी सापडला असता, अशी अपेक्षा दाम्पत्यांनी व्यक्त केली. आता या घटनेला महिना लोटला आहे. पोलीस ठाण्यातून एफआयआर कॉपी सुद्धा उपलब्ध करून दिली जात नाही. बँक एफआयआरच्या कॉपीसाठी अडून बसली आहे. हा प्रकार सामान्य माणसाची अडवणूक करणारा असल्याची खंत या दाम्पत्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :bankबँक