शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

१५ वर्षांपासून बाबासाहेबांच्या साहित्याचा एकही नवीन खंड नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आनंद डेकाटे, नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाचे साहित्य संपूर्ण जगात मार्गदर्शक असून, या साहित्याला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आनंद डेकाटे,

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाचे साहित्य संपूर्ण जगात मार्गदर्शक असून, या साहित्याला महाराष्ट्रासह देशात व परदेशातही मोठी मागणी आहे. हे विचारधन सर्वसामान्यांपर्यंत पोहचावे या हेतूने महाराष्ट्र शासनाने १५ मार्च १९७५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन केली. समितीची गेल्या ४४ वर्षांत केवळ २२ खंड व ३ सोअर्स मेटरियल एवढीच कामगिरी राहिली. २००६ पासून तर एकही नवीन खंड प्रकाशित झालेला नाही. म्हणजेच गेल्या १५ वर्षांपासून प्रकाशनाचे कार्य ठप्प पडलेले आहे.

बाबासाहेबांच्या साहित्याला (खंडांना) प्रचंड विक्रीमूल्य असतानादेखील राज्य शासन व प्रकाशन समिती या खंडाच्या पुनर्मुद्रण आणि प्रकाशित मराठी खंडाचा इंग्रजी अनुवाद व इंग्रजी खंडाचा मराठी अनुवाद करण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. प्रकाशित अनेक खंडांचे पुनर्मुद्रण कार्य, गेल्या १६ वर्षांपासून खंडाच्या मराठी अनुवादाची मुद्रित प्रकाशन समितीकडे मान्यतेसाठी प्रलंबित आहेत. इतकेच नव्हे तर आजवर प्रकाशित झालेल्या एकाही इंग्रजी खंडाचा मराठी अनुवाद प्रकाशित झालेला नाही.

शासनाने अलीकडेच प्रकाशन साहित्य समिती गठित केली. नागपूरचे डॉ. प्रदीप आगलावे यांच्याकडे सदस्य सचिवाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा या समितीमध्ये समावेश आहे. त्यामुळे १५ वर्षातील अनुशेष ही समिती भरून काढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

- बॉक्स

- धम्मचक्र प्रवर्तन दिनी नवीन खंड लोकांच्या हाती यावा

बाबासाहेबांचा अतिशय महत्त्वाचा असलेला प्रॉब्लेम ऑफ रुपी या इंग्रजी खंडाचे मराठी अनुवादित ग्रंथ ऑगस्टमध्ये प्रकाशित करावे, अशी मागणी लावून धरण्यात आली होती. प्रकाशन समिती व सरकारकडून याला सकारात्मक प्रतिसादही मिळाला. परंतु ते शक्य झाले नाही. आता किमान येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी हा ग्रंथ प्रकाशित होऊन लोकांच्या हाती यावा, अशी अपेक्षा आहे.

प्रकाश बंसोड, अध्यक्ष भारतीय दलित पँथर