शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१० हजार कि.मी च्या नव्या रस्त्यांवर टोल नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 22:37 IST

राज्यात हायब्रीड अ‍ॅन्युईटी मॉडेलच्या माध्यमातून ३० हजार कोटी रुपये खर्च करून १० हजार कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू करण्यात येत आहे. या रस्त्यांवर कुठेही टोल भरावा लागणार नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील माहिती५३ टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना सूट

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यात हायब्रीड अ‍ॅन्युईटी मॉडेलच्या माध्यमातून ३० हजार कोटी रुपये खर्च करून १० हजार कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू करण्यात येत आहे. या रस्त्यांवर कुठेही टोल भरावा लागणार नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा येथील बाह्यवळण मार्गाची दुरवस्था झाल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर महसूलमंत्री पाटील म्हणाले, हा रस्ता बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर तयार करण्यात आला. त्याचा कालावधी समाप्त झाल्याने या मार्गावरील टोल बंद झाला. त्यामुळे रस्ता दुरुस्तीचे काम थांबले. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निविदा काढण्याचे काम सुरू आहे. दरम्यान या आधीच्या कंत्राटदारासोबत येत्या सोमवारी अथवा मंगळवारी बैठक घेऊन रस्ता दुरुस्तीबाबत निर्णय घेण्यात येईल. या रस्त्याने इतर मोठी वाहने वाढली आहेत. त्यामुळ येथे टोलनाका उभारून मोठ्या वाहनांकडून टोल वसुली करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यातील ५३ टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना टोल बंद केला असून मोठ्या वाहनांकडून टोल वसुली केली जात आहे. राज्यात यापुढे मोठ्या वाहनांसाठी टोल लावण्यात येणार असून सर्वसामान्य वापरत असलेल्या किंवा त्यातून प्रवास करीत असलेल्या छोट्या वाहनांना टोल वसूल केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.खसडसेंनी विचारले ‘टोलमुक्त महाराष्ट्र’चे काय ?महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंब्रा येथील बाह्यवळण मार्गाची दुरुस्ती करून तेथे मोठ्या वाहनांवर टोल आकारण्याचा विचार असल्याचे सांगताच माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी हा मुद्दा उचलला. ते म्हणाले, सरकार आता पुन्हा बीओटीवर रस्ते बांधून टोल आकारण्याचे धोरण स्वीकारणार आहे का? आपण केलेली घोषणा ‘टोलमुक्त महाराष्ट्र’चे काय झाले, अशी प्रश्नांची सरबत्ती करीत त्यांनी पाटील यांना अडचणीत आणले. ही संधी साधत अजित पवार यांनी यापुढे ‘टोलमुक्त महाराष्ट्र’ची घोषणा अस्तित्वात राहणार नाही का, अशी विचारणा करीत सरकारवर नेम साधला.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग