शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

१० हजार कि.मी.च्या नव्या रस्त्यांवर टोल नाही; ५३ टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना सूट - चंद्रकांत पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 06:36 IST

राज्यात हायब्रीड अ‍ॅन्युईटी मॉडेलच्या माध्यमातून ३० हजार कोटी रुपये खर्च करून १० हजार कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू करण्यात येत आहे. या रस्त्यांवर कुठेही टोल भरावा लागणार नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

नागपूर : राज्यात हायब्रीड अ‍ॅन्युईटी मॉडेलच्या माध्यमातून ३० हजार कोटी रुपये खर्च करून १० हजार कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू करण्यात येत आहे. या रस्त्यांवर कुठेही टोल भरावा लागणार नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा येथील बाह्यवळण मार्गाची दुरवस्था झाल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर महसूलमंत्री पाटील म्हणाले, हा रस्ता बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर तयार करण्यात आला. त्याचा कालावधी समाप्त झाल्याने या मार्गावरील टोल बंद झाला. त्यामुळे रस्ता दुरुस्तीचे काम थांबले. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निविदा काढण्याचे काम सुरू आहे. दरम्यान याआधीच्या कंत्राटदारासोबत येत्या सोमवारी अथवा मंगळवारी बैठक घेऊन रस्ता दुरुस्तीबाबत निर्णय घेण्यात येईल. या रस्त्याने इतर मोठी वाहने वाढली आहेत. त्यामुळे येथे टोलनाका उभारून मोठ्या वाहनांकडून टोलवसुली करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यातील ५३ टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना टोल बंद केला असून मोठ्या वाहनांकडून टोलवसुली केली जात आहे. राज्यात यापुढे मोठ्या वाहनांसाठी टोल लावण्यात येणार असून सर्वसामान्य वापरत असलेल्या किंवा त्यातून प्रवास करीतअसलेल्या छोट्या वाहनांकडून टोल वसूल केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.‘टोलमुक्त महाराष्ट्र’चे काय ?महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंब्रा येथील बाह्यवळण मार्गाची दुरुस्ती करून तेथे मोठ्या वाहनांवर टोल आकारण्याचा विचार असल्याचे सांगताच माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी हा मुद्दा उचलला. ते म्हणाले, सरकार आता पुन्हा बीओटीवर रस्ते बांधून टोल आकारण्याचे धोरण स्वीकारणार आहे का? आपण केलेली घोषणा ‘टोलमुक्त महाराष्ट्र’चे काय झाले, अशी प्रश्नांची सरबत्ती करीत त्यांनी पाटील यांना अडचणीत आणले. ही संधी साधत अजित पवार यांनी यापुढे ‘टोलमुक्त महाराष्ट्र’ची घोषणा अस्तित्वात राहणार नाही का, अशी विचारणा करीत सरकारवर नेम साधला.

टॅग्स :tollplazaटोलनाकाNagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७