शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील २१ हजारांहून अधिक जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 10:40 IST

स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत ६५ ते ७० मीटर उंचीच्या टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. दुसरीकडे ३० वर्षे जुन्या इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिट करणे बंधनकारक असतानाही महापालिके कडे इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणारी स्वतंत्र यंत्रणा नाही.

ठळक मुद्देलाखो नागरिकांची सुरक्षा धोक्यातमनपाकडे स्वतंत्र यंत्रणाच नाही

गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत ६५ ते ७० मीटर उंचीच्या टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. दुसरीकडे ३० वर्षे जुन्या इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिट करणे बंधनकारक असतानाही महापालिके कडे इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणारी स्वतंत्र यंत्रणा नाही. शहरात अशा २१ हजारांहून जास्त इमारती आहेत. या इमारतीत वास्तव्यास असलेल्या लाखो नागरिकांचे छत त्यांच्यासाठी जीवघेणे ठरण्याची शक्यता आहे. रहिवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट (संरचनात्मक परीक्षण) करण्यासाठी महापालिके च्या अभियंत्यांचे स्वतंत्र पॅनल नाही. शहराची विकासाकडे वाटचाल सुरू असताना धोकादायक इमारतींचा डेटा महापालिके च्या नगररचना विभागाकडे उपलब्ध असणे अपेक्षित आहे. परंतु प्रशासन वा पदाधिकारी यासंदर्भात फारसे गंभीर नसल्याचे चित्र आहे. नागपूर शहरात ५.५० लाख इमारती आहेत. त्यात २१ हजाराहून अधिक इमारती ३० वर्षापूर्वीच्या आहेत. ६० वर्षाहून अधिक १०८६ इमारती अधिक धोकादायक आहेत. ५० वर्षाहून अधिक जुन्या १७१५ तर ४० वर्षाहून जुन्या इमारतींची संख्या ४ हजाराहून अधिक आहे. मालमत्ता सर्वेक्षणात जुन्या इमारतींची आकडेवारी पुढे आली आहे.गत काळात मुंबईत जुन्या इमारती पडून लोकांचे जीव गेल्यावर महापालिका कायद्यानुसार स्ट्रक्चरल ऑडिट करून बंधनकारक असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यास इमारत निवासासाठी सुरक्षित आहे की नाही याची शहानिशा शक्य होते. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने असे आॅडिट होणे आवश्यक आहे. मात्र महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा नाही. गरज असेल तर नागरिकांनीच यासाठी तक्रार करावयाची आहे. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून दखल घेतली जाईल. अशा परिस्थितीत वर्दळीच्या भागातील जुन्या इमारतीमुळे दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जुन्या इमारतीच्या पुनर्विकासाबाबत परवनगीसाठी अर्ज आल्यास समितीकडून मंजुरी दिली जाते. जीर्ण कांचन स्मृती इमारत काही दिवसांपूर्वी पडली होती. या इमारतीच्या पुनर्विकासासाठी अर्ज आला आहे. शहरातील जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणारी स्वतंत्र यंत्रणा महापालिकेच्या नगररचना विभागाकडे अस्तित्वात नाही.- पी.बी.गावंडे, सहायक संचालक नगररचना विभाग, महापालिका

धोकादायक इमारतींचा डेटा उपलब्ध नाहीशहरातील ६० वर्षापूर्वीच्या इमारती धोक ादायक आहेत काय, अशा किती इमारती उभ्या आहेत की पाडून नव्याने बांधल्यात. कोणत्या इमारती पाडण्याची गरज आहे, याची कोणतीही माहिती महापालिकेच्या रेकॉर्डला उपलब्ध नाही. त्यामुळे एखाद्या रहिवाशाच्या तक्रारीनंतरच महापालिका अशा धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिटसाठी पुढाकार घेणार आहे. न्५

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका