शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी म्हणतात टंचाई नाहीच; मग चारा गेला कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 11:09 IST

जिल्ह्यातील तीन दुष्काळग्रस्त तालुक्यात चारा टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. जिल्ह्यात चाऱ्यासाठी पशुपालकांची भटकंती पहिल्यांदाच होत असून, मराठवाड्यासारख्या चारा छावणीची गरज आहे.

ठळक मुद्देजनावरांची तडफड दुष्काळग्रस्त तालुक्याची विदारक अवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील तीन दुष्काळग्रस्त तालुक्यात चारा टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. जिल्ह्यात चाऱ्यासाठी पशुपालकांची भटकंती पहिल्यांदाच होत असून, मराठवाड्यासारख्या चारा छावणीची गरज आहे. जनावरांचे पोट भरण्यासाठी गावागावात तणसाच्या पेंढ्या ट्रकने येत आहे. अशी स्थिती असताना पशुसंवर्धन विभागाच्या कागदावर तीनही दुष्काळग्रस्त तालुक्यात १,२३, ०९५.७२ मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. पशुपालक ट्रक भरून भरून तणस आणत असेल, तर हा चारा गेला कुठे? असा सवाल पशुपालकांकडून होत आहे.नागपूर जिल्ह्यात काटोल, कळमेश्वर आणि नरखेड तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित केले आहे. दुष्काळाचा फटका जनावरांना चांगलाच बसत आहे. या तीनही तालुक्यात आजच्या घडीला जनावरांसाठी वैरण राहिलेले नाही.पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार काटोलमध्ये ७८२८७, कळमेश्वरमध्ये ४७४४८ व नरखेडमध्ये ६९८७३ जनावर नोंदणीकृत आहे. पशुसंवर्धन विभागाने या जनावरांसाठी ४८ दिवसाला लागणाºया वैरणाचे आकडेही दिले आहे. यात काटोल तालुक्यात १४१६९.६, कळमेश्वरमध्ये ८७१४.४ व नरखेडमध्ये १३०५९.८४ मेट्रिक टन लागते आहे. आजच्या घडीला विविध माध्यमातून उपलब्ध मुबलक वैरण उपलब्ध असल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांचे आकडे बोलतात. काटोलमध्ये ४८७१८.६० मेट्रिक टन, कळमेश्वरमध्ये २८८०२.६२ मेट्रिक टन व नरखेडमध्ये ४५५७४.५० मेट्रिक टन एवढे वैरण पशुसंवर्धन विभागाच्या कागदावर आहे. त्यामुळे काटोलात केवळ तीन तीन दिवस, कळमेश्वरमध्ये नऊ दिवस व नरखेडमध्ये एक दिवस चाऱ्याची तूट भासणार असल्याचा स्थानिक पशुधन अधिकाऱ्यांनी अहवाल दिला आहे.ही सर्व आकडेवारी फोल असल्याचे स्थानिक पशुपालकांचे म्हणणे आहे. जनावरांसाठी मध्यप्रदेशातील छिंदवाडा व बैतूल जिल्ह्यातून कुटार आणावे लागत आहे. भंडारा जिल्ह्यातून तणस मोठ्या प्रमाणावर आणले जात आहे.एका एका गावात १० ते १२ गाड्या दररोज तणसाच्या येत आहे. एका एका गाडीवर ८ ते १० हजार रुपये पशुपालकाला खर्च करावे लागत आहे. जनावर जगवावी या विवंचनेत पशुपालक असताना, विभागाच्या खोट्या आकडेवारीमुळे पशुपालकांनी संताप व्यक्त केला आहे.

टंचाई नसेल तर चारा अधिकाऱ्यांनी उपलब्ध करावाजानेवारी महिन्यापासून चारा टंचाई भेडसावत आहे. आता तर तालुक्यातील चाराच संपला आहे. माझ्याकडे २०० जनावरं आहे. त्यांना खाऊ घालण्यासाठी २५ गाड्या तणसाच्या बोलाविल्या आहे. अधिकारी जर चाऱ्याची टंचाई नाही, असे म्हणत असेल, तर त्यांनी चारा उपलब्ध करून द्यावा.- इशाक बुराडे, पशुपालकपहिल्यांदाच असा दुष्काळ काटोल तालुक्यात अनुभवत आहे. अधिकारी केवळ कार्यालयात बसून दुष्काळाचे नियोजन करीत आहे. जनावरे भुकेने आजारी पडत आहे. पशुपालकांनी जनावर बाजारात विकायला काढली आहे. चारा टंचाई नाही, असे म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांनी गावात यावे, जनावरांची अवस्था बघावी. दुष्काळ असतानाही अधिकाऱ्यांकडून अहवालात दुष्काळ दाखविला जात नाही. जनावरे मरो अधिकाऱ्यांना काही घेणेदेणे नाही. अधिकाऱ्यांच्या अहवालात चारा टंचाई नसली तरी, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांक डे चारा छावणीसाठी मागणी केली आहे.- चंद्रशेखर चिखले,माजी उपाध्यक्ष, जि.प. नागपूर

टॅग्स :agricultureशेती