शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
2
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
3
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
4
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
5
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
6
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
7
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
8
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
9
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
10
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
11
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
12
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
13
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
14
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
15
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
16
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
18
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
19
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
20
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू

आरोपींवरच्या कारवाईवर निर्णय नाही

By admin | Updated: September 30, 2014 00:37 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील रोस्टर घोटाळ्यात सामील आरोपींवरील कारवाईसंदर्भात पोलिसांचा निर्णय झालेला नाही. आज, सोमवारी पोलिसांनी वेळ वाढवून मागितल्यामुळे मुंबई उच्च

रोस्टर घोटाळा : पोलिसांनी घेतला वेळनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील रोस्टर घोटाळ्यात सामील आरोपींवरील कारवाईसंदर्भात पोलिसांचा निर्णय झालेला नाही. आज, सोमवारी पोलिसांनी वेळ वाढवून मागितल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी प्रकरणावरील पुढील सुनावणी दिवाळीच्या सुट्यांनंतर निश्चित केली.सीताबर्डीचे पोलीस निरीक्षक संजय वेरणेकर यांनी ८ सप्टेंबर रोजी प्रतिज्ञापत्र सादर करून कारवाईसंदर्भात दोन आठवड्यांत निर्णय घेण्याची ग्वाही दिली होती. परंतु, त्यांना वेळेचे बंधन पाळता आले नाही. विद्यापीठ सहकार्य करीत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. रोस्टर घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई करण्यासाठी प्रा. सुनील मिश्रा यांनी फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. २००२ ते २००८ या कालावधीत राखीव प्रवर्गातील ५०६ नियुक्त्यांमध्ये झालेला गैरप्रकार ‘रोस्टर घोटाळा’ म्हणून ओळखला जातो. घोटाळ्याच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जी. जी. लोणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. समितीने ५ जानेवारी २०११ रोजी तत्कालीन कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांना अहवाल सादर करून आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४६९, ४७१ अन्वये गुन्हा नोंदविण्याची शिफारस केली आहे. घोटाळ्यात वजनदार आरोपी सामील असल्यामुळे पोलीस दबावात असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक स्थापन करण्यात यावे, आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात यावी व न्यायालयात कृती अहवाल सादर करण्यात यावा, अशी याचिकाकर्त्याची विनंती आहे.(प्रतिनिधी)