शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
4
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
5
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
6
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
7
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
8
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
9
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
10
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
11
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
14
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
15
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
16
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
17
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
18
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
19
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
20
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

अंबाझरीतील अविवेकी पर्यटनावर नियंत्रणच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 12:36 IST

Nagpur News Ambazari lake अंबाझरी जैवविवधता उद्यानात पर्यटनाच्या नावाखाली अलीकडे मनमौजी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. परिणामत: भविष्यात येथील पक्षिवैभव धोक्यात येऊन डोळ्यादेखत नष्ट होण्याचा धोका वाढला आहे.

ठळक मुद्देअन्यथा डोळ्यादेखत नष्ट होऊ शकते पक्षिवैभव

 गोपालकृष्ण मांडवकर    लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंबाझरी जैवविवधता उद्यानात पर्यटनाच्या नावाखाली अलीकडे मनमौजी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. एकेकाळी फक्त पक्षी अभ्यासक आणि पक्षी छायाचित्रकारांसाठीच प्रवेश असणाऱ्या या उद्यानात आता शुल्क भरून पर्यटक जातात, मनात येईल तसे वागतात. परिणामत: भविष्यात येथील पक्षिवैभव धोक्यात येऊन डोळ्यादेखत नष्ट होण्याचा धोका वाढला आहे.राज्य शासनाने ५ नोव्हेंबरपासून पक्षी सप्ताह जाहीर केला. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी खंत आणि तळमळ व्यक्त करणारी तक्रार पक्षी अभ्यासकांकडून करण्यात आली. कार्तिक चिटणीस या युवा पक्षी अभ्यासकाने केलेल्या तक्रारीत भविष्यातील धोका व्यक्त करतानाच येथील गलथानपणाही उघड केला आहे. हे उद्यान वन पर्यटन म्हणून घोषित झाल्यापासून पक्षी अभ्यासक कमी आणि मनमौजी पर्यटकच अधिक वाढले आहेत. अनेक जोडपी या मुक्त वातावरणात फिरायला येतात. झुडपात शिरून संगीताचा आनंद घेतात, वाद्य वाजवतात. बरीच मंडळी परिवारासह पर्यटनला येतात. पर्यटनाचे नियम, धोरणाचा पत्ता कुणालाही नसतो. एवढेच नाही तर पार्कमध्ये कसे वागावे, यासंदर्भात कुणीही हटकत नाही. माहिती नाही, मार्गदर्शनही  नाही. आपल्याच आनंदात फिरणाऱ्या या पर्यटकांमुळे पक्षी विचलित होतात. 

कालव्याजवळचा अधिवास पक्ष्यांनी सोडलायेथील नाल्यावर कालवा बांधून वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट बांधला जात आहे. दीड वर्षापासून हे काम सुरू आहे. यंत्रांचा आवाज, कामगारांची वर्दळ, आवाज यामुळे या परिसरातील पक्ष्यांनी तेथील अधिवास सोडला आहे. हा नाला म्हणजे एकेकाळी विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा हॉट स्पॉट होता. पक्षी निरीक्षक विनीत अरोरा यांच्या निरीक्षणानुसार, अनेक वर्षापासृून येथे नवरंगा राहायचा. यंदा त्याने ही जागा सोडली. कॉमन किंग फिशरही ही जागा सोडून गेले आहेत. 

आगीमुळे धोकाकाही महिन्यापूर्वी येथे आग लागली होती. पक्षी झाडावर राहत असले तरी त्यांचे खाद्य गवतामध्ये असते. आगीत गवत जळाल्याने खाद्य संपुष्टात आले. परिणामत: पक्षी दुसरीकडे गेले. या बर्ड पार्कमध्ये वाढलेली माणसांचा अविवेकी वावर आता धोकादायक ठरायला लागला आहे.

टॅग्स :Ambazari Lakeअंबाझरी तलाव