शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

नागपूर मनपातील ४५९ कर्मचारी व अधिकाऱ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 23:21 IST

अनुसूचित जाती, जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्ग जातीच्या असलेल्या व आरक्षणाच्या आधारे नागपूर महापालिका सेवेत रुजू झालेल्या परंतु त्यानंतर जात पडताळणीबाबतचे प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या ४५९ इतकी आहे. यातील ३३० प्रकरणे जात पडताळणी समितीकडे प्रलंबित आहेत. १२९ जणांनी जातीच्या प्रमाणपत्राबाबत कोणत्याही प्रकारची माहिती सामान्य प्रशासन विभागाडे सादर केलेली नाही. माहिती सादर न करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्दे३३० प्रकरणे समितीकडे प्रलंबित : १२९ कर्मचाऱ्यांनी माहितीच सादर केली नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनुसूचित जाती, जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्ग जातीच्या असलेल्या व आरक्षणाच्या आधारे नागपूर महापालिका सेवेत रुजू झालेल्या परंतु त्यानंतर जात पडताळणीबाबतचे प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या ४५९ इतकी आहे. यातील ३३० प्रकरणे जात पडताळणी समितीकडे प्रलंबित आहेत. १२९ जणांनी जातीच्या प्रमाणपत्राबाबत कोणत्याही प्रकारची माहिती सामान्य प्रशासन विभागाडे सादर केलेली नाही. माहिती सादर न करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.अनुसूचित जाती, जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्ग जातीच्या असलेल्या व आरक्षणाच्या आधारे शासकीय सेवेत दाखल झालेल्या परंतु जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या किंवा जातीचे दाखले अवैध ठरलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत संरक्षण देय ठरत नसल्याबाबत सवोंच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. परंतु या निर्णयाचे होणारे दूरगामी परिणाम विचारात घेता या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी व शासन शिफारस करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यात आली आहे.महापालिका सेवेतील ज्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादरे केलेले नाही अशा कर्मचाऱ्यांवर कशा स्वरुपाची कारवाई करता येईल यासंदर्भात महापालिकेने शासनाकडे मार्गदर्शन मागिलेले आहे. परंतु अद्याप या संदर्भात निर्देश मिळालेले नाही. जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबविण्यात आलेली आहे. जात प्रमाणपत्रे अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांना सेवामुक्त होईपर्यंत खुल्या प्रवर्गातील समजण्यात यावे तसेच ज्या राखीव जागावर नियुक्ती देण्यात आलेली आहे अशा जागा रिक्त समजण्यात येणार आहे.दोन कर्मचारी निलंबितमहापालिकेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील राखीव जागेवर रुजू झाल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने श्रीकांत इलामे तसेच अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर रुजू झालेल्या लक्ष्मी गिल्लोर यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे या दोन कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेतून काही महिन्यापूर्वी बडतर्फ करण्यात आले आहे.मनपा सभागृहात चर्चा होणारमागसवर्गीय कर्मचाऱ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भात काँग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे यांनी महापालिकेच्या गेल्या सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित केला होता. मात्र सभागृहाचे कामकाज स्थगित झाल्याने यावर चर्चा झाली नाही. पुढील बैठकीत यावर चर्चा होणार आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाCaste Certificateजात वैधता प्रमाणपत्र