शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यातील अडचणींवर आतापासूनच उपाय हवेत : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 22:59 IST

उपराजधानीला जागतिक दर्जाचे शहर बनविण्यासाठी आवश्यक असलेली विकासकामे वेगाने सुरू आहेत. मात्र विकास साधत असताना भविष्यातील संभाव्य अडचणी व अडथळ्याचादेखील विचार केला पाहिजे. यावर आतापासूनच उपाय शोधले पाहिजेत. विविध संकल्पनांच्या माध्यमातूनच हे काम होऊ शकते, असे मत राज्याचे ऊर्जामंत्री व राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. ’महापौर इनोव्हेशन अवॉर्ड’अंतर्गत आयोजित ‘हॅकेथॉन’चे शुक्रवारी उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्दे 'महापौर इनोव्हेशन अवॉर्ड’अंतर्गत आयोजित ‘हॅकेथॉन’चे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीला जागतिक दर्जाचे शहर बनविण्यासाठी आवश्यक असलेली विकासकामे वेगाने सुरू आहेत. मात्र विकास साधत असताना भविष्यातील संभाव्य अडचणी व अडथळ्याचादेखील विचार केला पाहिजे. यावर आतापासूनच उपाय शोधले पाहिजेत. विविध संकल्पनांच्या माध्यमातूनच हे काम होऊ शकते, असे मत राज्याचे ऊर्जामंत्री व राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. ’महापौर इनोव्हेशन अवॉर्ड’अंतर्गत आयोजित ‘हॅकेथॉन’चे शुक्रवारी उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला आ.गिरीश व्यास, आ.जोगेंद्र कवाडे, महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय, मनपा आयुक्त अभिजित बांगर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे, ‘एआयसीटीई’चे सल्लागार दिलीप मालखेडे, ‘नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे प्रामुख्याने उपस्थित होते.नागरिकांच्या जीवनशैलीमध्ये सुलभता आणणाऱ्या अनेक संकल्पनांचा सरकारलाही स्वीकार करावा लागतो. तरुणांनी पुढाकार घेऊन शहर, राज्य व देशाच्या विकासासंबंधी, नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुलभता आणणाºया संकल्पना मांडल्या पाहिजेत, असे बावनकुळे म्हणाले.तरुणांच्या संकल्पनांद्वारे शहराच्या विकासात भर घातली जावी, या उद्देशाने ‘महापौर इनोव्हेशन अवॉर्ड’ची संकल्पना पुढे आली. मात्र या नवसंकल्पनांचा स्वीकार करताना आपल्याला आपली मानसिकता व सवयी बदलणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महापौरांनी केले.आज ‘स्मार्ट’ या शब्दाने संपूर्ण जीवन व्यापले आहे. नवसंकल्पनात्मक तंत्रज्ञानामुळे जीवनशैलीत झपाट्याने बदल होत आहे, असे डॉ.काणे म्हणाले. तर आज तंत्रज्ञानाने विकासाला मोठी गती मिळाली आहे. मात्र या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग होऊ नये याची काळजी घेतली जाणे आवश्यक आहे, असे डॉ.उपाध्याय यांनी सांगितले.‘हॅकॉथॉन’मध्ये नागपूरसह वर्धा, बल्लारपूर, औरंगाबाद येथील तरुणांनी सहभागी होउन आपल्या संकल्पनांची प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. सोबतच दिवसभर विविध विषयांवर व्याख्यान व गटचर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले. निखील चांदवानी, श्रीयश जिचकार, केतन मोहितकर, अथर्व मोरोणे, आशिष खोले, सुमीत उरकुडकर, अविनाश सिंग यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेMayorमहापौर