शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

यंदा रेडिरेकनर दरात बदल नाही; दोन वर्षांपासून दर स्थिर

By मोरेश्वर मानापुरे | Updated: March 31, 2024 20:30 IST

या आदेशामुळे ग्राहकांना प्रॉपर्टी खरेदी-विक्री करताना गेल्यावर्षीच्या रेडिरेकनर दरानुसार मुद्रांक शुल्क भरावे लागतील.

नागपूर : राज्य सरकारने गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही वार्षिक मूल्यदर तक्ता अर्थात रेडिरेकनर दरात कोणताही बदल केलेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील प्रॉपर्टीचे रेडिरेकनर दर स्थिर आहेत. हे दर एप्रिल महिन्याच्या १ तारखेला महाराष्ट्र राज्यातील सर्व भौगोलिक क्षेत्रासाठी स्थावर मालमत्तेचे वार्षिक दर तक्ते प्रकाशित करण्यात येतात.

या संदर्भात महाराष्ट्र राज्य पुणेचे मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी तथा नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे यांनी सन २०२३-२४ करिता वार्षिक दर तक्ते व मूल्याकनाच्या मार्गदर्शक सूचना न बदलण्याबाबत तथा कायम ठेवण्याबाबतचे निर्देश ३१ मार्च रोजी दिले आहेत. याची प्रत मंत्रालयातील महसूल, मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाचे अपर मुख्य सचिव आणि महालेखापाल, (लेखापरिक्षा)-२ नागपूर यांना पाठविली आहे. या आदेशामुळे ग्राहकांना प्रॉपर्टी खरेदी-विक्री करताना गेल्यावर्षीच्या रेडिरेकनर दरानुसार मुद्रांक शुल्क भरावे लागतील.

शासनाच्या निर्देशानुसार सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता १ एप्रिल २०२४ पासून अंमलात असलेले सन २०२२-२३ चे (सन २०२३-२४ साठी लागू) वार्षिकदर तक्ते, मूल्यांकन मार्गदर्शक सूचना व बांधकाम दर संपूर्ण राज्यासाठी कायम ठेवण्यात आले आहेत. आर्थिक वर्ष-२०१७ पासून एप्रिलच्या १ तारखेला रेडिरेकनर दरातील बदल जाहीर करण्यात येतो.   हे वार्षिक दर तक्ते नोंदणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सर्व्हिसेस या सदराखाली एएसआर या ठिकाणी प्रोसेस येथे उपलब्ध आहेत.