शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उष्णतेशी लढण्याचा ‘प्लॅन’ आहे, पण ‘फंड’ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2023 08:00 IST

Nagpur News सरकारने नागपूरसह विदर्भातील शहरात उष्णतेशी लढण्यासाठी ‘उष्णता कृती याेजना’ (हिट ॲक्शन प्लॅन) तयार तर केला आहे. पण यातील सूचना, बदल क्रियान्वित करण्यासाठी निधीबाबत स्पष्टता नसल्याने अंमलबजावणीबाबत शंका उपस्थित हाेते आहे. 

निशांत वानखेडे

नागपूर : सरकारने नागपूरसह विदर्भातील शहरात उष्णतेशी लढण्यासाठी ‘उष्णता कृती याेजना’ (हिट ॲक्शन प्लॅन) तयार तर केला आहे. पण यातील सूचना, बदल क्रियान्वित करण्यासाठी निधीबाबत स्पष्टता नसल्याने अंमलबजावणीबाबत शंका उपस्थित हाेते आहे. शिवाय स्थानिक परिस्थितीनुसार वैज्ञानिक अभ्यासाचा आधार नसल्याने याेजनेचा लाभ हाेईल की नाही, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात येणाऱ्या उष्णतेच्या लाटा जीवघेण्या तर असतातच पण आर्थिकदृष्ट्या हानीकारक असतात. त्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने एचएपी (हिट अॅक्शन प्लॅन) तयार केले आहेत. या एचएपीचे वास्तव जाणून घेण्यासाठी सेंटर फाॅर पाॅलिसी रिसर्च (सीपीआर) या संस्थेने देशभरात तयार केलेल्या उष्णता कृती याेजनांचे मूल्यांकन केले आहे. यात १८ राज्यातील ३७ एचएपीचा अभ्यास करण्यात आला आहे. त्या याेजनांमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी असल्याचे सीपीआरचे आदित्य पिल्लई यांनी सांगितले. नागपूरसह विदर्भातील बहुतेक कृती याेजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रियाच स्पष्ट नाही. नागपूरसह चंद्रपूर, गाेंदिया, वर्धा, अकाेला, वाशिम, बुलढाणा या शहरांचा हिट ॲक्शन प्लॅन तयार झाला आहे. शिवाय नाेडल अधिकारीही नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र अनेक गाेष्टींचा अभाव आहे. यात महत्त्वाची कमतरता म्हणजे याेजनेसाठी निधीची स्पष्टता नाही. त्यामुळे याेजना कशी राबविणार, याबाबत शंका येते.

तापमानाचा वैज्ञानिक अभ्यास नाही

स्थानिक स्तरावरील तापमानाच्या परिस्थितीचा वैज्ञानिक अभ्यास दिसून येत नाही. दरवर्षी तापमान किती वाढते, पारा किती अंशावर गेल्यास मृत्यू ओढवतात किंवा आराेग्यावर परिणाम हाेतात? गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक याप्रमाणे काेणता घटक उष्णतेने अधिक प्रभावित हाेताे? या अभ्यासाद्वारे ठराविक तापमानाच्या प्रभावाची सीमारेखा लक्षात येते. विदर्भातील काेणत्याही शहराच्या याेजनेत हे दिसून येत नाही. आधीच खूप उशीर झाला आहे, हे लवकर निर्धारित करण्याची गरज आहे, असा इशारा पिल्लई यांनी दिला.

इतर महत्त्वाच्या त्रुटी

- वाढते तापमान कृषीला अधिक प्रभावित करते. एचएपीमध्ये त्याचा कुठलाही अभ्यास नाही.

- याेजनांमध्ये वृद्ध, घराबाहेरील कामगार, गर्भवती स्त्रिया अशा असुरक्षित गटाची यादी तयार आहे पण सुचविलेल्या उपाययाेजना या गटांवर लक्ष केंद्रित करीत नाही.

- उष्णता कृती याेजना स्थानिक परिस्थितीचा संदर्भ लक्षात घेऊन तयार करण्यात आले नाहीत.

- कृती याेजनांमध्ये पुरेशी पारदर्शकता नाही. या याेजना राष्ट्रीय व राज्यस्तरीय पातळीवर सार्वजनिकरीत्या उपलब्ध नाही.

गेल्या वर्षी ५ शहरे जागतिक यादीत

गंभीर बाब म्हणजे गेल्या वर्षी विदर्भातील पाच शहरे सर्वाधिक तापमानाच्या जागतिक यादीत समाविष्ट हाेते. चंद्रपूरचे तापमान जगात पहिल्या क्रमांकावर हाेते. शिवाय अकाेला, नागपूर, वर्धा व वाशिम शहरांनी उष्णतेचा उच्चांक गाठला हाेता.

टॅग्स :weatherहवामान